* शिवसेना व युवसेनेच्या वतीने उत्कृष्ट गणेश विसर्जन स्पर्धा
तेल्हारा ( प्रतिनिधी)-शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक गुरुवारी रात्री अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेच्या वातावरण पार पडली यावेळी शिवसेना व युवसेना तेल्हाराच्या वतीने उत्कृष्ट गणेश विसर्जन स्पधा ठेवण्यात आल्याने व बक्षीसे मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आल्याने गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत शिस्तीत सह विविध देखावे सादर करीत शहरातील जनतेचे मनोरंजन केले यावेळी गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान कुठलीही अनुचित प्रकार घडला नाही यावेळी दरवर्षी प्रमाणेच सहा गणेश विसर्जन शिवाजी गणेशोत्सव मंडळ तानाजी गणेशोत्सव मंडळ धर्मविर गणेशोत्सव मंडळ बजरंग गणेशोत्सव मंडळ शिव गणेशोत्सव मंडळ लोकमान्य गणेशोत्सव मंडळ या मंडळांनी आपले देखावे सादर केले
शिवाजी मंडळाने वान धरणातील पाणी आरक्षीत केल्याने सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलन संदर्भातील देखावा सिंचनासाठी पाणी नाही मिळाले तर शेतकऱ्यांची होणारी फजिती या वर आधारित देखावा सादर केला होता पब्जी पासुन युवकांनी सावध राहाणे हा देखावा बँड पथक लेझीम शेतकरी आंदोलनाचा देखावा सादर केला पोखाख शिस्त आदी देखावे सादर केले होते तर तानाजी मंडळाने गणपती बाप्पा सरकारला बुध्दी दे शेतकऱ्यांना हक्काचे पाणी त्यांना मिळु दे हा देखावा पाणी अडवा पाणी जिरवा टाळ मृदंग ढोल पर्यावरण पावली विट फोडणे नेत्रदान रक्तदान संस्कुती चे रक्षण बेटी बचाव बेटी पळाव वेसनमुक अंधश्रद्धा व्यसन गजानन महाराज मूर्ती देखावा मुलीना शिक्षण दया आदी विविध सामाजिक उपक्रम यावेळी सादर केले संभाजी मंडळाने रस्ता सुरक्षा अभियान वाहन सुरक्षा अभियान ढोलाचे भजन हेल्मेट संबंधित जनजागृती शास्त्राज्ञाचे आभार लाढी काडी भवरा आदी कार्यक्रम सादर केले बजरंग मंडळाने गणपती भक्तांना खिचडी वाटप केले व आपले कार्यक्रम सादर केले लोकमान्य मंडळाने ढोल ताशे मुती देखावा गणपती आरती हे कार्यक्रम सादर केले शिव गणेशोत्सव मंडळाने लहाण मुलीचे नृत्य आदी कार्यक्रम सादर केले व विविध कार्यक्रम सादर केले.यावेळी शांतता कमिटीचे सदस्य,जेष्ठ नागरिक,बहुसंख्य महिला नागरिक उपस्थित होते.तेल्हारा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत मंडळाच्या कार्यकर्ते व पोलिसांच्या सहकार्याने जवळपास दीड तास अगोदर मिरवणूक आटोपती घेतली हे विशेष.