अकोला (प्रतिनिधी)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा, मुंबई यांच्या सुचनेनुसार २०१९ सालचे तिसरे राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०१९ रोजी अकोला जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये सकाळी १०:३० ते संध्या ०५:३० दरम्यान करण्यात येणार आहे. या लोक न्यायालयामध्ये जी प्रकरणे निकाली निघतात त्यातील पक्षकारांना निम्मलिखीत फायदे होतात:
१. लोकन्यायालयाच्या निवाडया विरूद्ध अपील नाही.
२. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते .
३. खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात.
४. निकाल झटपट लागतो.
५. लोकन्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना कोणाची हार.
६. लोकन्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो.
७.परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकातील द्वेश वाढत नाही व कटूताही निर्माण होत नाही.
८. कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवाडयाची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते .
९. वेळ आणि पैसा यांची बचत होते.
१०.लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते.
स्वरूप बोस, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला. तरी उपरोक्त फायदे विचारात घेता ज्या पक्षकारांची वर नमुद संवर्गातील प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा खटलापुर्व प्रकरणे न्यायालयात की, त्यांनी आपली प्रलंबीत व दाखल पुर्व प्रकरणे सदर राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरीता संबंधीत न्यायालय , तालुका विधी सेवा समीती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला ( ०७२४– २४१०१४५ ) यांच्याशी संपर्क साधावा आणि राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद समोपचाराने कायमचे मिटवावेत असे अध्यक्ष श्री वाय जी खोब्रागडे व श्री स्वरुप बोस सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला यांनी जाहीर आव्हान केले.