बार्शीटाकळी (प्रतिनिधी): शहरात गोर सिकवाडी गोर सेनेच्या वतीने बंजारा समाजतील माता-भगिनींचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला 48 तांड्यातील माता-भगिनी उपस्तित होत्या. यावेळी माता-भगिनींनी आपले विचार मांडले. बंजारा समाजातील माता-भगिनींना एकत्र करत गोर सिकवाडी गोरसेने कडून बार्शीटाकळी शहरातील प्रभूपार्वती मंगल कार्यालय येथे शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबरला माता-भगिनींचा मेळावा घेण्यात आला. यावेळी मेळाव्याला तब्बल 48 तांड्यातील नायक, नायकीन, कारभारी, कारभरीन आणि महिलांनी मोठ्या संख्येत उपस्तिथी दर्शवली. या मेळाव्यात बंजारा महिलांनी बंजारा समाजाच्या संस्कृती जतन करत, बंजारा पेहराव, बंजारा समजातील मौखिक गीतं, बंजारा नृत्य सादर केले.
यावेळी वैष्णवी राठोड, प्रिया पवार, वैष्णवी राठोड, संगीता बायी चव्हाण, प्रिया जाधव यांनी आपले विचार मंचावर मांडले, या कार्यक्रमाला गोरसिकवाडीचे प्रमुख काशीनाथ नायक, सौ संध्याताई जाधव यांची प्रमुख उपस्तिथी लाभली. गोरसोकवाडी सहसंयोजक रवी जाधव, विकास जाधव, गोरसेना महानगर अध्यक्ष रतन आडे, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष सुनील जाधव, शहर अध्यक्ष राहुल राठोड, तालुका उपाध्यक्ष अतिष राठोड, जयसिंग, दिनेश चव्हाण, संघटक सेवकभाऊ, अविभाऊ, शिवराज भाऊ, दिनेशभाऊ, कारभारी अविनाशभाऊ, राजनखेड सर्कलमधील जीवनभाऊ, मनोजभाऊ, चेतन, साजन, हंसराज, रोशन (चेलका), रोशन जाधव (लोहगड), बाबूलाल जाधव, राम चव्हाण, ऋषिकेश राठोड, पिंजर सर्कल: गोपाल, इंदल, दिलीप पवार, खुशाल जाधव, संजय पवार, संतोष राठोड, रुपेश पवार, राजेश, महेश, चेतन राठोड, शुभम पवार, तसेच चेलका, बोरमळी, राजनखेड, या तांड्यातील महिलांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.