*वानधरणाच्या पाणी प्रश्नना वरून शेतकरी एकवटले
*आमदारांच्या चुप्पीवर शेतकरी संतप्
*मंगळवारी आकोट विधानसभा मतदारसंघ बंदचे आयोजन *
*सोमवारी शेकळो शेतकरी देतील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
तेल्हारा (प्रतिनिधी)- शेतकरी बांधवांच्या हक्काचे वाण धरणाचे पाणी अकोला शहरासाठी शासनाने आरक्षित केल्यामुळे सिचनाचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे शेतकरी बांधव संतप्त झाले असून ८ सप्टेंबला वाण प्रकल्प कार्यालयात घेण्यात आलेल्या शेकळो शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत आमदारांच्या चुप्पीवर शेतकरी बांधव संतप्त झाले होते असून ९ सप्टेंबरला सोमवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे तर शासनाने वानचे पाणी पडविल्याच्या निषेधार्थ १०सप्टेंबरला मंगळवारी आकोट विधानसभा मतदारसंघ बंद चे आवाहन शेतकऱ्यांनच्या वतीने करण्यात आले या वेळी अकोटच्या शेतकऱ्यांनि होणाऱ्या बंद ला पाठींबा दिला आहे।
शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या हनुमान सागरातील वाण धरणाचे पाणी शासनाने अकोला शहरातील अमृत योजनेसाठी इतर अनेक पर्याय उपलब्ध असतांना शेती सीचनासाठी महत्वपूर्ण असलेल्या प्रकल्पावरच डोळा का असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे संतप्त झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनि गावोगावी जाऊन जनजागृती करून बैठकी घेतल्या व त्या नंतर पाणी प्रश्न ना वरून शेतकऱ्यांनी वाण प्रकल्प येथे रविवारी बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत तेल्हारा सह संग्रामपूर तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांनि आपल्या तीव्र भावना वयक्त केल्या या वेळीं शेतकऱ्यांनि आपले हक्काचे पाणी कोणत्याही परिस्थितीत इतरत्र न जाऊ देण्यासाठी निवेदन, धरणे आंदोलन ,बंद पुकारने, मोर्चा , उपोषण, ग्रामपंचायत चे ठराव इत्यादी प्रकारचे आंदोलन करून सुध्दा शासनाने वाण चे पाणी पळविल्यास वेळ प्रसगी धरणावर जाऊन जलसमाधी घेण्या बाबत आपले मत व्यक्त केले तसेच आकोट मतदार संघाच्या लोकप्रतिनिधी ना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा सुध्दा अनेक शेतकऱ्यांनी दिला दरम्यान काही शेतकरी स्थानिक आमदारांना भेटण्यासाठी गेले असता स्थानिक आमदार यांनी वानच्या पाण्याचा एक थेंब सुध्दा जाऊ देणारे नाही असे सांगितले होते आता वानचे पाणी पडविल्या गेल्यावर सुध्दा आमदारांचे मौन का असा प्रश्न शेतकरी बांधवानी उपस्थित केला या शेकळो शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनि एकमुखी निर्णय घेऊन सोमवारी दि ९सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येईल त्यानंतर मंगळवार दि १०सप्टेंबरला शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आकोट विधानसभा मतदारसंघ बंद करण्याचे ठरविण्या आले या वेळी आकोट येथील शेतकऱ्यांनि बंदला पाठींबा देण्याचे ठरविले तसेच व्यापारी संघटनेनेसुध्दा बंद ला पाठींबा दिला बैठकी ला तेल्हारा ,संग्रामपूर सह आकोट तालुक्यातील एक हजाराच्या वर शेतकरी उपस्थित होते