तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातून या पूर्वी भारत राखीव बटालियन कॅम्प अकोला तालुक्यात पडविण्यात आला व आता तेल्हारा तालुक्यातील वाण धरणाचे पाणी अकोला साठी आरक्षित करण्यात आल्यामुळे तालुक्यातील पडवापडवी थांबता थांबे ना अशी परिस्थिती निर्माण झाल्याने येथील शेतकरी बांधव संतप्त झाले असून या विभागाचे लोकप्रतिनिधी करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
तेल्हारा तालुक्यातील तळेगांव वडनेर येथे मंजूर झालेला भारत राखीव बटालियन कॅम्प अकोला तालुक्यातील सिसा उदेगाव हिंगणा शिवारात पडविण्यात आला त्यानंतर बटालियन कॅम्प कोणी पडविला याचा शोध घेण्यासाठी बटालियन बचाव कृती स्थापन केल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधी चे धाबे दणाणले होते कृती समितीने आंदोलनात्मक भूमिका घेतल्या नंतर तो मी नव्हेच ची भूमिका अनेकांनी घेतली होती वातावरण चिघळन्याची चिन्हे दिसताच कृती समिती सह आमदार व भाजपा चे शिस्ट मंडळाने मंत्रालय गाठून मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी करून बटालियन कॅम्प तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर येथेच राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते परंतु पुढे काय झाले हे कोणीही स्पस्ट सांगण्यास तयार नाही आता तसेच तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनसाठी वरदान ठरलेल्या वानधरणाचे पाणी अकोला साठी आरक्षित करण्यात आल्यामुळे आता हे पाणी कोणी पडविले व कोणी पडवू दिले यावर शेतकरी बांधव विचार मंथन करू लागले आहेत या पडवापडवीच्या प्रकारामुळे शेतकरी बांधव चांगलेच संतप्त झाले आहेत नुकतेच हिंगणी येथील कार्यक्रमात शेतकऱ्यांनी पाणी आरक्षित करण्याबाबत प्रश्न विचारला असता आमदार प्रकाश भारसाकळे सविस्तर उत्तर देऊ शकले नाही त्यामुळे या पुढे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या बैठकीत पाणी प्रश्न पेटणार असल्याचे दिसून येत आहे