तेल्हारा(प्रतिनिधी): वाण धरणाचे पाणी अकोल्या साठी आरक्षित करण्याची माहिती मिळताच तेल्हारा तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले असून यावर विचार विनिमय करण्यासाठी समस्त शेतकरी बांधवांची बैठक ८ सप्टेंबरला वाण प्रकल्प कार्यालय तेल्हारा येथे दुपारी १ वाजता घेण्याचे ठरविण्यात आले आहे। वान धरनाचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे त्यामुळे आपल्या शेती करीता पाणी राहनार नाही तरी पुढील विचार विनिमय करण्या साठी रविवार दि ८/९/१९ दुपारी १ वाजता वान कार्यालय तेल्हारा येथे आयोजित केलेलीं आहे करीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आयोजित बैठकीला हजर रहावे या सभेला दादाराव देशमुख व ताठे हे मार्गदर्शन करतील तरी सर्वांनी हगर रहावे असे शेतकऱ्यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे बैठक यशस्वी व्हावी या करिता आज बहुतांश शेतकऱ्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती केली त्यामुळे पुन्हा एकदा पाणी आरक्षणाचा मुद्दा तेल्हारा तालुक्यात पेटणार असल्याचे दिसत आहे वाण धरणाची एकंदरीत क्षमता ही ८४द.घ.ल.मी. एवढि आहे या पैकी ८४ खेडी पाणीपुरवठा योजना अंतर्गत ८.६६ टक्के , आकोट शहरा करिता ४.३९ टक्के,तेल्हारा शहरा करीता ३.१६ टक्के,जळगाव जामोद करिता १२.४७४ टक्के,शेगाव करिता५.३९ टक्के तर नव्याने मंजूर झालेल्या १५९ खेडी योजने अंतर्गत ३.७१६ टक्के तर बाष्पीभवन ८ टक्के ,जमिनीतील गळती ३टक्के, धरणातील गाळ ५ टक्के असे एकूण ५३.९०८ टक्के पाणी वगळता शेतकऱ्यांना ४६.९२ टक्के पाणी सीचनाकरिता मिळत होते परंतु सीचनाकरिता उरलेल्या पाण्यातीलही २४ द.घ.ल.मी. पाणी अकोला करिता आरक्षित करण्यात आल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना सीचनापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे त्या मुळे शेतकऱ्यांन मध्ये असंतोष निर्माण होत आहे