अकोट(देवानंद खिरकर): अकोट तहसिलमधे गाढव सोबत आणून त्या गाढवावर अधिकारी पदाचे फलक लावुन अधिकारी हटवा,गाढव बसवा,,असे आंदोलन करनार्या विरुध्ध 6 ऑगस्ट रोजी अकोट शहर पोलिस स्तेशनमधे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तहसीलदार अशोक गिते यांच्या मार्फत मंडळ अधिकारी अनिल ओइंबे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीमधे लोहारी खुर्द येथिल 100 व्यक्तींनि गाढवावर उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,नायब तहसीलदार,ग्रामसेवक ,तलाठी या नावाचे बेनर लावुन तहसिल कार्यालयातील सर्व विभागात प्रवेश केला.तसेच कार्यालयातील सर्वच विभागातून अधिकार्याच्या टेबल समोर फोटो काढले.तसेच बैंडपथकाद्वारे अनधिकृत व गैरकायदेशीर मंडळी जमवून तहसिल कार्यालयात प्रवेश केला.यावेळी अधिकारी हटवा गाढव बसवा तसेच अधिकार्यांच्या नावाने घोषनाबाजी केली.सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला.घोंधळ घालुन तहसीलदार यांच्या दालणातील दरवाजाला लाथा मारल्या.या गोंधळा मुळे महिला व कर्मचारी,अधिकार्यासह ईतर निराधार योजनेचे लाभार्थी घाबरुन गेले होते.याप्रसंगी तहसीलदार,नायब तहसीलदार यांना मौजे लोणी खुर्द येथिल चंद्रिका नदीवरिल स्वरक्षन विधानाबाबत हुज्जत घातली.अशा आशयाची तक्रार अकोट शहर पोलिस स्टेशनला देण्यात आली.या फिर्यादी वरुन अकोट शहर पोलिस स्टेशनमधे श्रीराम प्रफुल्ल म्हैसने,केशव अवचित डिक्कर,अशोक साहेबराव म्हैसने,पुरुषोत्तम म्हैसने,सदाशिव ठाकरे,प्रफुल्ल गोवर्धन म्हैसने,रुपराव शेषराव डिक्कर,यांच्यासह 90,ते 100 जणाविरुध्द भादवी 186,143 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.