अकोला(प्रतिनिधी)- पोलीस अधिक्षक अकोला यांचे आदेशानुसार आगामी सण उत्सव व विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने अकोला शहर तसेच संपुर्ण अकोला जिल्हयातील क्रियाशिल तसेच संशईत गुन्हेगार यांचे बाबत आर्म अॅक्ट खाली घरझाडत्या घेवुन कायदेशीर कार्यवाई करीता अभियान राबविले जात असुन वरील आदेशानुसार दि. ०५ /०९ /१९ रोजी पोलीस स्टेशन खदान अंर्तगत जिरा बावडी परीसरातील १) बाबर खान अख्तर खान वय-२९ वर्ष रा- जिरा बावडी,अब्दुल्ला कॉलनी,खदान २) सैय्यद रिहान सैय्यद ताज वय-२० वर्ष रा-खोकेवाली चाल सिंधी कॉप अकोला यांची घरझडती घेण्यात आली.सदर दोन्ही इसमांचे घरझडती मध्ये ०३ धारदार तलवारी किं. अं.३५००/-रु मिळुन आल्याने वरील आरोपीन विरूध्द पो.स्टे खदान अकोला येथे क.४/२५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला आहे. सदर कार्यवाही पो.उप.नि तुषार नेवारे , ए.एस.आय. अशोक चाटी.पो.कॉ.रफिक शेख,रवि इरछे, एजाज अहमद,अब्दुल माजीद, अनिल राठोड, यांनी केली.