अकोला(प्रतिनिधी)- महालक्ष्मीचे आगमन गुरूवारी मोठ्या उत्साहात झाले.गौरींच्या आगमनानिमित्त महिला या आधीपासुनच तयारी करत आसतात.हा सोहळा घरोघरी होत आहे.बाजारात ज्येष्ठागौरींच्या पुजनासाठी विविध साहित्य घेण्याकरिता महिलांची मोठी गर्दी दिसुन येत होती.गौरींना सजविण्यासाठी अनेक प्रकारचे दागिने, विविध आकाराच्या मुर्त्या खरेदी केल्या जात आहेत. परंपरेनुसार धातुची किंवा मातीची प्रतिमा ठेवून गौरींचे पुजन घरोघरी केले जाते.त्यास आकर्षक बसवून सजवतात. सुवासिक फुलांच्या माळा वनस्पतींची रोपे,खेळनी लाईटमाळ,सह आदी एकत्र बांधुन सजावट केली जाते.तसेच मुर्तीला साडी नेसवून अनेक प्रकारच्या अलंकाराने सजवले जाते.खाद्य पदार्थ ठेवले जातात हे सर्व कार्यक्रम शुभ मुहूर्तावर होतात. या सणानिमित्ताने महिला उत्साहा दिसुन येतो.तीन दिवसांच्या पाहुण्या आलेल्या ज्येष्ठागौरीला पुरणाचा नैवैद्य दाखविला जातो.तसेच दररोज सकाळी व संध्याकाळी विशिष्ठ प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. हा सण महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्वाचा असून धार्मिक परंपरेने श्रेष्ठ आहे.आणि शनिवारी गौरी विसर्जनाच्या निमित्ताने विधीवत पुजन, हळदीकुंकू सोहळा करून हरळ आगारा डोक्यावरती ठेवुन जेवायला देवुन विर्सजित केल्या जातात.