तेल्हारा (प्रतिनिधी): तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे वान धरणात पाण्याचा येवा पाहता धरणाचे दोन दरवाजे आज प्रत्येकी चाळीस सेंटीमीटर उघडण्यात आले असून वाहन नदीपात्रात २३०० क्युबिक सेंटिमीटर ने विसर्ग सोडण्यात आला असल्याची माहिती वान प्रकल्प अधिकारी अनिकेत गुल्हाने यांनी दिली आहे.
तेल्हारा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत धरणातील पाणीसाठा वाढला आहे ९० टक्के पाणीसाठा ठेवण्यात येणार येणार असून उर्वरित पाणीसाठा वान नदीपात्रात सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक वाढल्यास दोन पेक्षा जास्त दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात येणार असून वाहन नदीपात्रा शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबतचे पत्र वान प्रकल्प अधिकारी यांनी वरिष्ठांकडे दिले आहे