मुंबई- राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयामुळे राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या मूळ वेतनाच्या 32.50 टक्के वेतनवाढ दिली जाणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उर्जा-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता आणली आहे. राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरगोस वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, कंपन्यांच्या कर्मचारी संघटनेने या निर्णयाचे स्वागत करत ऊर्जामंत्र्यांचे आभार मानले आहेत. राज्यातील महावितरण, महापारेषण व महा निर्मिती या तिनही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या मूळ वेतनाच्या 32.50 टक्के तर विविध भत्त्यांमध्ये 100 टक्के वाढ करण्यात येणार आहे.