अकोट (देवानंद खिरकर)- अकोट पासुन सात किलोमीटर असलेल्या लोहारी खुर्द गावाला चंद्रिका नदीचा संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता संरक्षण भिंतिंच्या गेल्या अनेक वर्ष्याची जुनी मागणी प्रत्यक्ष अमलात येत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी राम म्हैसने यांच्या नेतृत्वात प्रत्यक्ष गाढव महसूल विभागात नेऊन अधिकारी हटवा गाढव बसवा अभिनव आंदोलन केले हे आंदोलन संपुर्ण शहर तथा तालुकाभर चर्चेचा विषय बनला आहे.
अकोट तालुक्यातील लोहारी खुर्द, चीचखेड, लोहारी बुजरुग, या तिन गावाच्या मधातून चंद्रिका नदीचे पात्र गेले आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी मुळे लोहारी खुर्द व चिचखेड गावाला पुरापासुन धोका निर्माण झाला आहे. परिणामी कुठलाही क्षणी नैसर्गिक आपत्ती मध्ये ही दोन गावे नदी पात्रात वाहून जातिल अशी वास्तु स्थिती आहे. विशेष म्हणजे संकट मोचन हनुमान मंदिरच प्रथम पुरामधे वाहुन जाऊ शकते. त्यामूळे लोकांच्या भावनेच उद्रेक होण्यची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी दोन-तीन वेळा आलेल्या पुराच्या पाण्याची धडक गावकाठाला लागल्यामूळे लोहारी खुर्द व चिंचखेड गावच्या अस्तित्वावरच प्रश्णचिन्ह निर्माण झाले आहे. या बाबत सरक्षण भिंतीचे काम सुरु करावे अशा मागणीचे निवेदन 22 ऑगस्ट ला उपविभागीय अधिकारी यांना दिले होते. मात्र नेहमी प्रमाने अधिकारी यांनी या बाबीची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी अधिकारी हटवा गाढव बसवा अंदोलन करुन चक्क सजवलेल्या गाढवांची तथा अधिकार्यांच्या पदांच्या नावासहित वरात महसूल विभागाच्या आवारात सर्व ग्रामस्थांच्या हजेरित काढण्यात आली.
अखेर प्रशासनाने नमते घेत संरक्षण भिंतीच्या संदर्भात सबंधीताकडे आठवड्यातच प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे तहसीलदार अशोक गिते यांनी ग्रामसस्थाशी बोलतांना सांगितले. अधिकारी यांनी दिलेला शब्द पाळला नाहितर परिणामी पर्वा न करता अधिकार्यांची गाढवावर वरात काढण्याचा ईशारा ग्रामसस्थांनी दिला आहे. यावेळी राम म्हैसने, गजानन डोबाळे, हरिचंद्र म्हैसने, मंगेश म्हैसने, नाना म्हैसने, बाबाराव म्हैसने, अनिल म्हैसने, शरद ठाकरे, रुपराव डिक्कर, प्रकाश म्हैसने, मारोती लोखंडे, यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.