अकोला (प्रतिनिधी)- वान धरणासाठी तेल्हारा तालुक्यातील शेतकर्यांनी आपली शेती दिली व प्रकल्पासाठी लागेल ते सहकार्य केले. परंतू आज त्यांनाच वान धरणातील पाण्यासाठी वंचित राहावे लागत आहे. वान धरणातून अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील साथ पानी पुरवठा योजनांना पानी देण्यात येते. अकोट शहर पानी पुरवठा, तेल्हारा शहर पानी पुरवठा,जळगाव जामोद पानी पुरवठा, 84 खेडी पानी पुरवठा, शेगाव शहर पानी पुरवठा, 140 गावे पानी पुरवठा, 159 गावे प्रादेशिक पानी पुरवठा , आनी त्यात भर म्हणून आता अकोला शहर पानी पुरवठा योजनेस द.ल.घ.मी.पानी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामूळे तेल्हारा तालुक्यातील शेतकर्यांनी सिंचन कसे करावे. अकोला शहराला पानी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाण्याचे स्तोत्र त्यांनी निर्माण करावे.
साथपूडयाच्या पायथ्याशी अनेक नद्या आहेत. ज्याचे पानी पावसाळ्यात वाहुन जाते तिथे पाण्या संधर्भात प्रकल्प किवा धरण निर्माण करुन अकोला शहराची पानी टंचाई भागवता येते. परंतू तसे न करता वान धरणातील पानी आरक्षित करुन शासनाने शेतकर्याची घोर फसवणूक केली आहे. तसेच वान धरणामधे गाळाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाले आहे.त्या मूळे धरणाच्या पाण्याची क्षमता सुध्धा कमी झाली आहे. तरी वान धरणातील गाळ काढल्यास धरणाची पाण्याची साठवणूक क्षमता वाढेल. तरी आम्ही तेल्हारा तालुक्यातील शेतकर्याच्या वतीने आपल्याला निवेदन देत आहोत की वान धरणाचे पानी यापुढे कुठल्याच पानी पुरवठा योजनेसाठी आरक्षित न करता फक्त शेतकर्याच्या सिंचनासाठी आरक्षित राहू द्यावे. तसेच शासनाने अकोला शहर वाढीव पानी पुरवठा साठी आरक्षित केलेला निर्णय रद्द करण्यात यावा ही विनंती. न केल्यास प्रहार जनशक्तीपक्ष ,तसेच तेल्हारा तालुक्यातील शेतकरी उग्र अंदोलन करतील. त्या सबंधीसर्व जबाबदारी ही शासनाची राहिल.ही विनंती. अशा आशयाचे निवेदन दिले आहे. निवेदन देतेवेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.तुषार दादा पुंडकर व बहुसंख शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.