अकोट (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथे गणपती उत्सव व महालक्ष्मी यात्रा निमित्त शांतता समितीची सभा ग्राम पंचायत मध्ये पार पडली. यावेळी सरपंच प्रदीप ठाकूर यांनी अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच अ. जमील अहमद यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी आपल्या भाषणात उत्सव साजरा करतांना कशा प्रकारे दक्षता घ्यावी हे सांगितले आणि डिजे बद्दल माहिती दिली. सभेला गावातील हिंदू मुस्लिम समाजातील लोक व गणपती मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सरपंच प्रदीप ठाकूर तंटामुक्ती अध्यक्ष रामदास तायडे, पंजाबराव बोचे, रामदास आघडते, अ जमील अहमद, इमायत हुसेन, राजेंद्र भुस्कट, गणेश भारसाकडे, कलीम मास्टर, जावोद्दीन मेंबर, नाजिम कुरेशी, साहेबराव आकोटकर, नसिरो दीन गजानन आकोटकार सागर अघळते हे उपस्थित होते. यानंतर ग्रामीण चे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी महालक्ष्मी मातेच्या यात्रेनिमित्त सुरक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. बोर्डी नदीला पूर आल्यामुळे त्या ठिकाणी कच्चा पुल तयार करण्यात आला होता आणि तो वाहून गेला. नदीला जर जास्त प्रमाणात पाणी आले तर भाविकांना दर्शनासाठी त्रास होऊ शकतो. या ठिकाणी जास्त प्रमाणात पोलिस बंदोबस्त देऊ असे आश्वासन दिले.