अकोट (देवानंद खिरकर)- विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा याकरिता शिवछत्रपती साम्राज्य बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था अकोट चे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट संतोष खवले विविध स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करीत असतात. यावर्षी सुद्धा राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन संस्थेद्वारा करण्यात आले आहे. राज्यात प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याला 21000 रुपये संतोष खवले यांच्यातर्फे तर द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये, तृतीय क्रमांक अकरा हजार रुपये याप्रमाणे बक्षिसे देण्यात येतिल. त्याचसोबत प्रत्येक तालुक्यात पहिल्या तीन क्रमांक साठी अनुक्रमे 5000, 4000, 3000 याप्रमाणे बक्षीस देण्यात येईल. परीक्षेमध्ये 90 पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एकशे एक रुपया तर प्रत्येक तालुक्यात पाचशे एक रुपयाचे दहा प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येतिल. अशी माहिती संस्था सचिव कु. ऐश्वर्या बेराळ यांनी दिली स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रितिक राणे, आशिष भटकर, गजानन शिवकार, शेख फारुख, रोहित वानखडे, शिवसिंग सोळंके, प्रतीक इंगोले, श्रुतिका हाडोळे, विजय रजाने, निकिता काशीदे,अमेरून शहा, प्रणाली रोकडे, सुषमा रायबोले, अश्विनी वाघमारे, प्रियांका घोडीले, विजय येवले, सुरेश गवारगुरु, पुनम मुळे, नलिनी नेमाडे, हर्षा नेमाडे, आरती हिवराळे, वैष्णवी रंदे, पूजा लापुरकर, पुष्पा लापुरकर, नागेश वाकोडे, अर्जुन बावस्कार, शिवम सोलंके, विशाल जवळकर, कविता गावंडे, वृषाली गुरेकर, कीर्ती पवार इत्यार्दी परिश्रम घेत आहेत.