तेल्हारा (प्रतिनिधी): श्री गजानन महाराज मंदिर संस्थान शेगांव येथे जात असलेल्या बेलखेड येथील महादेव मंदीर पालखी दिंडीचे तेल्हारा येथे ठिकठिकाणी पूजन करून स्वागत करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे श्रीसंत गजानन महाराज संस्थान शेगांवला जाणा-या श्री महादेव संस्थान बेलखेड येथून निघणाऱ्या बेलखेड येथील पायदळ वारी पालखीचे आगमन श्री. संत सावता, प्रबोधन, यश काॅलनी मध्ये झाल्यानंतर भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित भक्तांनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले. तसेच पालखी मधील महिला पुरूष भक्तांचे स्वागत करण्यात आले. यावर्षी वारीतील भक्तांचे आगमन झाल्यानंतर स्वागत व दिंडी पूजन केल्यानंतर पालखी मंडळाचे वतीने शिवशंकर डांगे साहेब, राऊत सर, सचिन ठोंबरे सर, सत्यशील सावरकर यांचा शेलादुप्पटा श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी बेलखेड येथील ज्येष्ठ नागरिक हरीभाऊ उंबरकार, बाळासाहेब निमकर्डे, बि. टी. तायडे सर, देविदास नागपूरे ,अॅड. श्रीकांत तायडे, वेरूळकार साहेब, अरूण वानखडे, अरबट सर, देऊळकार सर, संजय इंगळे, बाळासाहेब नागपूरे, आशिष सदाफळे, निशांत सदाफळे, बाळू येनकर, शाम डाबंरे, प्रशांत वानखडे, बालु वानखडे, ओमप्रकाश उगले, गणेश सुशिर, अंबादास व्यवहारे, प्रदीप राऊत सह बेलखेड वारीतील महिला पुरूष भक्तगण, श्री संत सावता, प्रबोधन, यश काॅलनी तेल्हारा मधील महिला पुरूष भक्तगण उपस्थित होते. त्यानंतर पुढे पालखी दिंडीचे अनिल पोहणे यांच्या येथे पूजन करण्यात आले यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार, शहराध्यक्ष ओमप्रकाश सुईवाल ,दिपक पोहणे, किशोर भागवत, अनिल पोहणे, सुभाष फाटे उपस्थित होते.