पातूर (प्रतिनिधी): पातूर-बाळापूर महामार्गावरील पातूर पुलावरील जीव घेण्या गड्ड्यामुळे अपघात होणे सुरु असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे. हा पुल मुंबई ते हैदराबाद या राज्यमार्गावर असल्याने जड वाहनांची संख्या या मार्गावर होत असते. तसेच दिवसभर या महामार्गावरुन वाहने सुरु असतात. रात्रीला ही वाहने गड्डे दिसत नसल्याने पलटी होत आहेत. गावामध्ये येणार हा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्याला लागुन पुरुषोत्तम अध्यापक महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महात्मा फुले महाविद्यालय, ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालय, वसंतराव नाईक विद्यालय, पातूर, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी लिद्यालय, पातूर किड्स पॅराडाईज् पब्लिक स्कूल, पातूर, रेणुका देवी संस्थान, पातूर, सावित्रीबाई फुले महाविद्यालय, पातूर, एज्यविला पब्लिक आ, पातूर यासह इतर छोटी प्रतिष्ठाने या महामार्गावर आहेत. त्यामुळे लहान शाळकरी मुलांना या गड्ड्यांमधुन प्रवास करावा लागतो. त्यामुळे या गड्ढयामुळे हा प्रवास विद्यार्थ्यांकरिता सुद्धा जीवघेणा ठरित आहे. या महामार्गाच्या या गड्ढयांची थातुर-मातुर दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र आज रोजी पुन्हा सदर गड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे या गड्ढयांची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.