भांबेरी (योगेश नायकवाडे): भांबेरी ते दापुरा रोड चे काम गेल्या १ वर्षापासून सुरु आहे पण अजूनही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच हा रस्ता तेल्हारा वरून अकोला जाण्यासाठी सर्वात सरळ रस्ता आहे पण ठेकेदाराच्या दिरंगाई मुळे या रस्ताचे काम अजूनही पूर्ण झाले नाही.आता तर पावसाळा सुरु झाल्यामुळे पावसाळ्याचे कारण सांगण्यात येत आहे तसेच या रस्त्यावर या अगोदर एक अपघात होऊन मरण पावला आहे. तसेच कल झालेल्या पावसामुळे सरस्वती नाल्या जवळील एक पूल पूर्णपणे खचला आहे त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक आणि बससेवा बंद आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची पास असूनही खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. जो पूल खचला आहे टो लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी भांबेरी मनब्दा व दापुरा येथील नागरिकांची होत आहे. आणि मनब्दा येथील सुधीर भाऊ पाथ्रीकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
युवक प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपप्रमुख शैलेश भाऊ नायकवाडे तसेच भांबेरीचे शाखा अध्यक्ष आशिष भाऊ उमाळे यांनी पाहणी केली असता पुल पूर्णपणे खचून गेला आहे आणि बससेवा बंद असल्यामुळे त्यांनी बस डेपो मध्ये माहिती केली तर त्यांनी असे सांगितले की पुलाचे काम झाल्या शिवाय बस सुरळीत होणार नाही. तर ठेकेदार तसेच शासनाने याची दखल घेतली नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असे युवक तालुका प्रमुख शैलेश भाऊ नायकवाडे यांनी बोलताना सांगितले.