बेलखेड (चंद्रकांत बेंदरकार): देश ! आपला देश ! आपला भारत देश !
घामाच्या आणि रक्ताच्या अभिषेकातून या भारतमातेच्या चरणांवर जिव ओवाळनारी आमची संस्कृती !
बलिदानाची परंपरा सांगणारा आमचा जाज्वल्य इतिहास ! वसुदेव कुटुम्बकमचा विचार जगाला देणारी विचारधारा ही या मातितूणच जन्मली.
या देशावर अनेक आक्रमणे झालीत पन प्रत्तेक वेळी येथील वीर भुमीपुत्राणी आपल्यातील पराक्रमाच्या जोरावर प्रत्तेक आव्हान परतून लावत या देशाला अभेद्य आणि अखंड ठेवले, या देशाचे सैनिक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष युध्दात कधीही कमी पडले नाहीत. पाकिस्तान शी झालेली प्रत्यक्ष युध्द असोत की दुर्गम कारगिल युध्द आमचा तिरंगा विजयी सलामी घेवून परतला. शत्रूला ला आमच्या वर प्रत्यक्ष विजय मिळवता येत नाही तर त्यांनी आतंकवाद निवडायला आणि भ्याड हल्ले करण्यास सुरूवात केली त्यांच्या त्यां योजणेलाही समर्थपणे सामना करत आमच्या वीर जवानांनी त्यां प्रत्तेक आतंकवाद्यांना इतिहासात जमा केले.
या वर्षी 14 फेब्रु. 2019 ला जम्मू कश्मीर मधील पूलगामा येथे नेहमीच्या रुटीन बेस वर जाणाऱ्या भारतीय लष्कराच्या वाहनांवर भ्याड हल्ल केला या भीषण हल्यात 40 वीर जवानांना वीर मरण आले. निशब्द करणारा हा काळा दिवस संपूर्ण देश दुख सागरात बुडाला मोठा संताप देशभर उसळला देश भरात शहिद कुटुंबा प्रति दुखद संवेदना उमटू लागल्या. माणूसपण जपणाऱ्या प्रत्येकाला या हल्ला खोल अंतर्मना पर्यंत वेदना देणारा होता जवानांच्या शरीराची तुकडे पाहून भारत भर दुख आणि संवेदना चा पूर आला पुलगामा पासून 4500 कीमि दुर सातपुड्याच्या पायरीही दुख सागरात बुडून गेली. माझे गावं बेलखेडातिल तरुणाई रस्त्यावर उतरून आपला आतंकवाद विरोधी संताप आणि आपल्या जवानां विषयी संवेदना प्रकट करत ‘अमर रहे अमर रहे’, ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. या गावात भूतो न भविष्यती एवढी मोठी शोभायात्रा येथील तरुणाई ने संघटीत होऊन काढली. संत गजानन महाराज मंदीराच्या प्रांगणात भव्य श्रध्दांजली चा कार्यक्रम घेण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय सिंह राजपूत या वीराणे या हल्यात आपले बलिदान दिले घरातील कर्ता गेला, लहान लाहान चिमुरड्या बाळांचे छ्त्र हरविले, त्यां परिवाराच्या या कठीण घडीला माझे गावं तन मन धनाने उभे राहिले. या परिवाराला आर्थिक मदती साठी काही हात पुढे आले. ही मदत त्यां परिवारा पर्यंत पोहचावी या साठी काही तरुण सामजिक कार्यकर्ते पुढे आली. अतुल निमकर्डे, संजय भोपळे, वीक्की पाटील खूमकर, निलेश उमाळे, राष्ट्रपाल डिगे, विजय सुनिल येनकर (काटकर ), राहुल वरठे, मयूर वरठे, धिरज वानखेडे, विशाल मलीये, सूरज खूमकर, प्रफुल्ल उंबरकार, घनश्याम दाते , शिवा मोहोड, अश्विन अढाउ, मयूर अढाउ, विजय चोपडे, श्याम गीर्हे , वैभव ऊगले, पवन तायडे, नरेंद्र पटिल खूमकर, शिवा गणेश राखोण्डे, वैभव भोपडे, म्रूणल दाते, अमोल वालूयकार, विनोद डिगे या गावातील तरुण मित्रांनी मदत पेटी फिरवून 15909/- रुपये येवढी रक्कम गोळा केली. त्यां रक्क्मेचा धनादेश स्वताहा शहिद पत्नी श्रीमती सुष्मा संजयसिंह रजपूत यांना बेलखेड ग्राम वसीया कडून रक्षाबंधन सस्नेह भेट म्हणून मलकापूर येथील त्यांचे निवासस्थानी जावून दिला.
या प्रसंगी सामजिक कार्यकर्ते विकी पाटील, निलेश उमाळे, संजय भोपळे, विजय सुशीर सुनिल येनकर हे उपस्थित होते. अश्या स्तुत्य उपक्रमाच्या श्रेणीत आमच्या गावचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या गावाने आपला अमीट ठसा प्रत्येक क्षेत्रात उमटविला आहे. या मातीने आज माणूसपणा आणि औदार्य जपत शहीद पत्नी च्या मागे भावा सारखे ठाम उभे राहिले आहे. अश्या माझ्या सुंदर गावाला आणि माझ्या जिवलग गावकऱ्यांना मानाचा प्रणाम ! ! ! !