अकोला(श्याम बहुरूपे):-किसान क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा काँग्रेसचे स्टार प्रचारक हार्दिक पटेल येत्या 4 व 5 तारखेला विदर्भ दौऱ्यावर येत असून ते अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
दिनांक 4 सप्टेंबर अकोला रोजी बाळापूर येथे होणाऱ्या महापर्दाफाश सभेत दुपारी 1 वाजता हजर राहतील. नंतर दुपारी 2.30 वाजता अकोला येथे काँग्रेस. एन.एस.यु.आय. आयोजित स्वराज्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या बेरोजगार मोर्चात सहभागी होतील. व सायंकाळी 6.30 ला पत्रकार परिषदेचे आयोजन.
5 सप्टेंबर.बुलढाणा रोजी बुलडाणा जिल्ह्यात शेगांव येथे सकाळी 10 वाजता गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन दुपारी 12 वाजता जळगांव जामोद येथे होणाऱ्या शेतकरी मोर्च्यात सहभागी होतील, त्यांच्या या नियोजित दौऱ्यात सोबत किसान क्रांती सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मंगेश भारसाकळे, प्रदेश महासचिव ऍड. राम कुऱ्हाडे, विदर्भ अध्यक्ष माणिक शेळके, प्रदेश उपाध्यक्ष प्रियंक बोरकर, अकोला जिल्हाध्यक्ष सागर ढगे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष अमित जाधव व समस्त राज्यातील पदाधिकारी उपस्तित राहतील.