पातुर(सुनील गाडगे)- चर्मकार समाजाचे आराध्यदैवत संत रविदास महाराज यांचे दिल्लीमधील तुकलाहाबाद येथील पुरातन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ चर्मकार समाज बांधवांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. तुगलकाबाद दिल्ली येथे इसवी सन 1500 पंधराशे पूर्वी राजा सिकंदर लोधी यांचेकडून गुरु रविदास मंदिरासाठी बारा एकर जागा गुरुदक्षिणा स्वरूपात मिळाली. इतिहासात नोंद असून 1947 -48 पासून सदर जागा रविदास मंदिर नावे महसूल खाते सातबारा मध्ये नोंद आहे. परंतु ही जागा एकतर्फी ताब्यात घेण्यात येऊन मंदिर बांधण्यात आले या कृतीत समाज बांधवांकडून निषेध व्यक्त करून पुन्हा मंदिर बांधून देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते राहुल शेंगोकार, अजू ढोणे, रामकृष्ण शेंगोकार, ज्ञानू शेंगोकार, निवास खंडारे, राहुल खंडारे, आनंदा शेंगोकार, गुलाब शेंगोकार, सुधाकर शेंगोकार, घनश्याम पुरुषोत्तम, गणेश पुरुषोत्तम, अभिजीत शेगोकार, सुनील माहुलीकर, भीमराव घायलकार, रामा शेंगोकार, पंकज शेगोकार रामदास शेगोकार इत्यादी असंख्य समाज बांधव यावेळी हजार होते.