तेल्हारा: (योगेश नायकवाडे) तेल्हारा न्यायालया अंतर्गत येणाऱ्या बार असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत निवडणूक न घेता अध्यक्ष व सचिव यांची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी ऍड.विलास जवंजाळ तर सचिव पदी ऍड. अतुल काकड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी वकील संघाचे सदस्य ऍड.नरेश चौधरी, ऍड.मंत्री,ऍड.अजित सेंगर, ऍड.नेरकर, ऍड.कुलकर्णी, ऍड.गोरडे, ऍड.तराळे, ऍड.शर्मा,ऍड.केसान, ऍड.एम झेड राठी,ऍड.एम एस राठी आदींची उपस्थिती होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. एम एन कुकडे यांनी काम पाहिले. अध्यक्षपदी ऍड.विलास जवंजाळ तर सचिवपदी ऍड. अतुल काकड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.