तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील खड्डेमय रस्त्यासाठी गेल्या महिन्याभरापासून कावड धारी शिवभक्त यांनी निवेदन, मोर्चे काढून सुद्धा प्रशासनाच्या वतीने कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्या उलट बांधकाम विभागाकडून खड्डेमय रस्त्यावर माती टाकून शिवभक्तांची दिशाभुल करण्यात येत आहे. आज शिवभक्तांनी कावड मार्गावरील रस्त्यावर संबंधित ठेकेदार खड्ड्या मध्ये माती टाकून बुजवीत असलेले काम शिवभक्तानी बंद पाडले व सर्व शिवभक्तांनी आक्रमक पवित्रा धरत थेट बांधकाम विभागाला जलाभिषेक करणार असल्याचा इशारा दिला आहे.
तेल्हारा तालुक्यातील कावड मार्गावरील खड्डेमय रस्त्यासाठी गेल्या महिन्याभर पासून शिवभक्तांच्या वतीने निवेदने, मोर्चे, धरणे आंदोलन, भीकमांगो आंदोलन करून सुद्धा प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. या उलट बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला हातशी धरून तेल्हारा तालुक्यातील कावड मार्गावरील खड्ड्यामध्ये मातीटाकून खड्डे बुजवण्याचा प्रकार सुरू आहे, ही बाब शिवभक्तांच्या लक्षात येताच शिवभक्तांनी थेट रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम बंद पाडले व बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना विचारांना केली असता याबाबत कुठलीही माहिती नाही असे उडवा उडवीचे उत्तरे दिले. यावेळी संतप्त झालेल्या शिवभक्तांनी बांधकाम विभागातील अधिकारी यांना वाढीस धरले. यावेळी तहसीलदार संतोष येवलीकर यांनी पाहणी केली. शिवभक्तांच्या वातिने करण्यात आलेल्या धरणे आंदोलनामध्ये 15 दिवसाच्या आत खड्डे बुजवण्यात येतील असे आश्वासन नुसते चॉकलेट होते का? असा सवाल शिवभक्तांच्या वतीने करण्यात आला.
बघा व्हिडिओ रिपोर्ट
येणाऱ्या चवथ्या सोमवार पर्यंत जर खड्डे बुजवण्यात आले नाही तर तेल्हारा येथील सर्व शिवभक्त कावड धारी मंडळ यांच्या वतीने बांधकाम विभागाला जलाभिषेक करण्यात येणार असल्याच्या इशारा देण्यात आला आहे. यावेळी तेल्हारा तालुक्यातील सर्व शिवभक्त कावडधारी मंडळ उपस्थित होते.
अधिक वाचा : सुशिक्षित बेरोजगांसाठी तपेश्वरीचा नोकरी मेळावा एक स्तुत्य उपक्रम – श्री.ह.भ.प. वासुदेवराव महाराज महल्ले
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola