भांबेरी (योगेश नायकवाडे) – ग्राम पंचायत चा डिजिटल महाराष्ट्र करणारा संगणक परिचालक(केंद्र चालक) ग्राम पंचायत चा कणा असून हाच संघणक परिचालक ग्रामीण भागातील जनतेला सेवा पुरविणारा एक व्यक्ती आहे. ह्या संघणक परिचालकाला विना मानधन कसे काय सेवा पुरवता येईल याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे असून ह्या संघणक परिचालकावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी शासनाने संघणक परीचालकांचे प्रश्न सोडवावे या करिता अकोला जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या वतीने मा.मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण दि.२०/०८/२०१९ पासून करण्यात येणार आहे जोपर्यत मागण्या मान्यहोत नाही तो पर्यत उपोषण सुरु राहील असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश मातळे ह्यांनी सांगितले आहे.
जिल्यातील बऱ्याच केंद्र चालकांचे मानधन एक ते दिड वर्षापासून झालेले नाही असे अकोला जिल्हाध्यक्ष अविनाश मातळे यांचे म्हणणे आहे. तसेच जिल्ह्यातील केंद्र चालकांचे मानधन हे ग्रामपंचायतच्या १४ वित्त आयोग मधून होते त्याकरिता ग्राम पंचायतला संघणक परिचालकांच्या मानधनाचा निधी उपमुख्यकार्यकारी जि.पं. अकोला यांच्या खात्यावर वर्ग करावी लागते. ती निधी एप्रिल – २०१९ पासून तर आज पर्यंत वर्ग केली गेली नसल्यामुळे सर्व जिल्ह्यातील केंद्र चालकांचे मानधन होण्यास विलंब होत आहे. तरी याबाबत वरिष्ठ अधिकारी ह्यांनी पाठपुरावा करावा असे संघनक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश मातळे यांचे मत आहे.
:- संघनक परिचालक यांच्या मागण्या खालीलप्रमाणे प्रमाणे आहेत :-
१. थकीत आणि चालू मानधन त्वरित मिळणेबाबत.
२. नेट बिल मिळणेबाबत.
३. ईग्राम सोफ्टवेअर मध्ये होणाऱ्या बदलामुळे तांत्रिक अडचणी येत असलेबाबत
४. सोफ्टवेअर,हार्डवेअर,कॉम्पुटर.प्रिंटर बंद असले बाबत