अकोट (प्रतिनिधी)- १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन या दुहेरी मंगलमय पर्वावर अकोट येथील लोकजागर महिला मंच समूहाने माजी सैनिक व पोलिस यांना राखी बांधून साजरा केला. ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्याला स्वतंत्र मिळवून दिले व पुढे हीच जबाबदारी प्राणपणाने पुढे नेत आपलं आयुष्य या देशाच्या रक्षणासाठी खर्ची घातलं. ज्यांनी आपल्या आयुष्यातील तारुण्य व उमेदीचा काळ सैन्यात देशाच्या रक्षणासाठी दिला. अशा माजी सैनिकांना राखी बांधून महिला समूहाने त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर देशाच्या बाह्य रक्षणासाठी सैनिक आणि देशांतर्गत रक्षणासाठी पोलिस या दोन्ही रक्षणकर्ता बांधवांचा राखी बांधून सन्मान करण्यात आला .
या प्रसंगी प्रथमतः विर अमर जवान स्तंभाचे माजी सैनिक व पोलिस यांचे हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर माजी सैनिक श्री पडोळे साहेब व श्री धांडे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले, आपल्या मनोगतात त्यांनी माजी सैनिक व पोलिस यांची आठवण ठेवून आम्हाला परत रक्षणाची जबाबदारी सोपविली त्याबद्दल लोकजागर महिला मंचाचे आभार मानले व कौतुक सुध्दा केले. कारण सैन्यातून परत आल्यानंतर समाजात आमची फारशी दखल घेतल्या जात नाही, परंतु लोकजागर च्या महिला भगिनींनी आमचा सन्मान केला त्याबद्दल कोणीतरी आपलं आहे आमचा पण सन्मान करायला असे भावनिक उदगार त्यांनी काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकजागर मंच चे जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार यांनी केले. या प्रसंगी पाणी फाऊंडेशन यांच्या वतीने जिल्हा समन्वयक श्री नरेंद्र काकड यांनी लोकजागर मंच या संस्थेने ” सत्यमेव जयते वॉटर कप ” स्पर्धेत दिलेल्या योगदाना बद्दल लोकजागर महिला पदाधिकारी यांचा सन्मानपत्र देवून सत्कार केला. या कार्यक्रमाला अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड, अकोट शहर पोलिस स्टेशन ठाणेदार संतोष महल्ले यांना सुध्दा महिलांनी राखी बांधून त्यांचे औक्षण केले. यावेळी कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचलन प्रकाश गायकी यांनी तर आभार अनंत सपकाळ सर यांनी मानले या कार्यक्रमाला लोकजागर मंचचे सदस्य व पदाधिकारी राजेश गावंडे, आकाश बरेठिया, योगेश जायले, सूरज शेंडोकार, दीपक बोडखे, देवा कायवाटे, अक्षय गावंडे, नगरसेवक अकिल पटेल, सैय्यद अहेमद, साजीद खान, अभिजीत कोकाटे, मयूर भगत, अमित डोबाळे, जाकीर खान, गजानन रावनकार, संतोष नळे, संतोष पा.पुंडकर, अनिल जायले, शांतीदूत फिरोज खान, नासिर सर, सय्यद हसन, अजहर खान , शाकिर खान, राजीव खारोडे सर, रोहित येउल, मंगेश खारोडे, आयुष गावंडे, सागर काकड, शिवा पोटे, मुजाहिद खान, केशव लोखंडे आदि सदस्य आवर्जून उपस्थीत होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकजागर महिला मंच च्या वैशालीताई बिबेकर, वंदनाताई रोहणेकर, भावनाताई गावंडे, अंजलीताई सपकाळ, स्मिता बोरोकार, सुवर्णाताई ठाकरे, मंजिरी बोरोकार, चैताली रावनकार, मुक्ता पळसकार, अंकिता सपकाळ, रुपाली पाटील, गायत्री तेलमुंगे, श्वेता शिवरकार, अंकिता खंडारे, प्रियंका केदार, दिव्या गौर, कल्याणी धर्मे, श्रुती गावंडे, वेदश्री गतफने सौ सुवर्णा ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट
लोकजागर महिला मंच समूहाच्या माजी सैनिक व पोलिस बांधव यांच्या रक्षाबंधन व औक्षण कार्यक्रमाला सर्वात वयोवृध्द व ज्येष्ठ माजी सैनिक असलेले आदरणीय श्री बोडखे काका कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.