तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्या सह शहरातील असंख्य कामगार हे आपल्या न्याय हक्का पासून वंचित असुन त्यांना नोंदणी साठी जाचक अटी या शासनाने लादल्या असून त्या सोईस्कर व्हाव्या या साठी मोठे आंदोलन उभारण्यात येणार असुन आम्ही त्या करीता कामगारांच्या पाठिशी सैंदव राहु. असे बोल आज झालेल्या कामगार मेळाव्यात भाई भारत पोहरकार यांनी काढले. यावेळी विशेष उपस्थित मध्ये असंघटीत कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष शैलेश सुर्यवंशी जेष्ठ नेते जे .पी .सावंग यांनी कामगार हा आपल्या हक्का पासुन वंचीत राहू नये त्यांनी आपले कायदेशीर हक्क समजून घेणे ही आजची गरज आहे. आम्ही आपल्या प्रत्येक अडचणीत सोबत असुन त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित लढा उभारला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
शैलैश सुर्यवंशी यांनी आपण तेल्हारा तालुक्यातील असंघटित कामगारांना साठी येत्या काळात मोठा लढा उभारून त्यांना शासनाचे मद्दत मिळून देण्यासाठी आंदोलन करणार आहोत. जेष्ठ नेते जे पी सावंग, यांनी मी तेल्हारा तालुक्यातील असल्याने मला प्रत्येक मजुरांन विषय माहिती असुन त्यांचे परिस्थिती काय आहे याची मला जवळुन कल्पना आहे, त्यामुळे त्यांनी नोंदणी करून आपले हक्क मिळवावे. यावेळी मिस्त्री संघटना अध्यक्ष निलेश पुदाखे, किशोर भाई, गुलाबराव इंगळे, संघपाल गवारगुरू, विलास ठाकरे, चंद्रकांत मोरे, सेवकराम हेरोडे, पुरुषोत्तम मानकर, विट्टल भाकरे, प्रकाश सोळंके हे होते. यावेळी उपस्थित असलेल्या कामगार याना विविध प्रकारच्या कामगार योजना चा लाभ घेण्यासाठी अर्ज करावे व त्याचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले यावेळी असंख्य महिला पुरुष कामगार यांची उपस्थिती होती.
अधिक वाचा : अकोट ग्रामीण रुग्णालयाच्या मागे जनावरांच्या मासाचे पोते आढळले
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
good information