बोर्डी (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील बोर्डी गावात मागिल आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे नदी नाले भरभरुन वाहले आहेत. घोगा नाल्याला आलेल्या फार मोठ्या पुरामूळे काही काळ वाहतुक सुधा बंद पडली होती. सततधार झालेल्या पावसामुळे बोर्डीतील 10 नागरिकांच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत. सुदैवाने यामधे कोणाचीही जिवित हानी झाली नाही. बोर्डीतील नागरिक कैलाश देशमुख, देवानंद रमेश खिरकर,अ.राजिक अ.खालिक, कमलाबाई पंजाबराव देशमुख, देवीदासजी बुले, किसन पंजाबराव देशमुख, अशोक सेवकराम तेलगोटे, दिनकर पंजाबराव देशमुख, विमल अर्जुन पडघन,बबलू गावत्रे,आदी नागरिकांच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत.काही घरांचा सर्वे बोर्ड़ीचे तलाठी खामकर यांनी केला आहे.व राहीलेल्या घरांचा सर्वे करण्यात येनार असुन येत्या दोन दिवसांत तहसिल कार्यालय अकोट येथे अहवाल सादर करणार असल्याचे बोर्ड़ीचे तलाठी खामकर यांनी सांगितले आहे.नुकसान ग्रस्त लोकांना शासनाने त्वरित आर्थीक मदत द्यावी.अशी मागणी बोर्डीतील नागरिकांन कडून होत आहे.