तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा येथे शहरातील सुशिक्षित युवा वर्गाकडून युवक युवतींसाठी “मन की बात युवओके साथ” कार्यक्रमाचे आयोजन उद्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित केला आहे.
तेल्हारा शहरात प्रथमच युवा संसद आयोजित केली असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध राजकीय, सामाजिक, उद्योग, शिक्षण, रोजगार, शेती, सुरक्षा अश्या अनेक विषयांवर चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तरुणांची उपस्थित राहणार आहे. उद्या दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी स्थानिक भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे दुपारी १ वाजता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी युवक युवतींनी उपस्थित राहावे असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.