अकोला (प्रतिनिधी)- जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे अनुषंगाने, तसेच ग्रामीण/शहरी भागात खेळविषयक सुविधा निर्माण करण्याकरीता, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला मार्फत, व्यायामशाळा विकास अनुदान योजना राबविण्याकरीता परिपुर्ण प्रस्ताव मागविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत व्यायामशाळा बांधकाम करणे, व्यायाम साहित्य खरेदी करणे तसेच खुली व्यायामशाळा (ओपन जिम) या तीन बाबींकरीता, प्रतीबात रूपये 7.00 लक्ष अनुदान मंजुर करण्यात येते, एकावेळेस एकाच बाबीकरीता प्रस्ताव अपेक्षित आहे.
अनुदानासाठी पात्र संस्थांसाठी प्राथम्यक्रम असा राहील. स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आदिवासी, विकास व सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणा-या सर्व शासकीय पुर्वप्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/आश्रमशाळा व वसतीगृह, क्रीडा विभागाच्या विविध समित्या, तसेच पोलीस कल्याण निधी/पोलीस विभाग, शासकीय स्पोर्टस् क्लब, तसेच शासकीय महाविद्यालये, याचप्रमाणे खाजगी शैक्षणिक, संस्थेव्दारे चालविण्यात येणा-या प्राथमिक, माध्यमिक शाळा क्र. महाविद्यालये जयांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे व ज्यांना शासनामार्फत अनुदानाचा प्रथम टप्पा मंजुर होवून, पाच आर्थिक वर्ष पुर्ण झाले आहेत, अशा संस्थांनी विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालयातुन प्राप्त करून जागेचे खरेदी/दानपत्र/नोंदणीकृत कागदपत्र, बँकबँलेन्स, करावयाच्याकामाचे अंदाजपत्रक, नोंदणी प्रमाणपत्रक गत वर्षाचे लेखा विवरण, तसेच शासन निर्णयानुसार आवश्यक कागदपत्रासह परिपुर्ण प्रस्ताव 20 ऑगस्ट पर्यंत दोन प्रतीत सादर करावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी कळविले आहे.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola