पातूर (सुनील गाडगे)- ग्रामगीता विचार युवामंच च्या वतीने अकोला जिल्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 50व्या पुण्यतिथी निमित्ताने 50 गावामध्ये सामुदायिक प्रार्थना करण्याचा संकल्प केला असून, त्याची सुरुवात पातूर तालुक्यातील नांदखेड येथून करण्यात आली. शनिवारी प्राथमिक शाळा प्रांगणात सामुदायिक प्रार्थना करण्यात आली.
यावेळी पातूर येथील संगीत तज्ञ तथा गुरुदेव प्रेमीं प्रा.विलासराव राऊत यांच्या हस्ते अधिष्ठान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अकोला येथील श्री. शेख गुरुजी, लुले गुरुजी, शुभम वरणकार, डॉ. रामजी उपाध्याय, मुकेश वाकोडे, दिलीप कराळे, सुरेश बोचरे, दामोदर बरडे, पत्रकार देवानंद गहिले, प्रणव सातपुते, ज्वल सावके, पार्थ दिवनाले आदी उपस्थित होते
भंडारज व शिर्ला येथे सुध्दा सोमपुरी जेष्ठ नागरिक संघ चे वतीने सुध्दा आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्ष श्री. नारायण अंधारे, विरपिता कांशीरामजी निमकडे, दामोदर अंधारे, ह.भ.प.महादेव महाराज निमकडे, राजू कोकाटे आदींसह नागरिक उपस्थित होते. प्रार्थना नंतर श्री सीदाजी महाराज भजन मंडळ पातूर यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला आणि पसायदान गायन करून समारोप करण्यात आला.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola