हिवरखेड (सूरज चौबे)- तुम्हाला थ्री इडियट पिक्चर मधला रँचो आठवत असणार तो जशा प्रकारे विविध उपकरण बनवतो तसाच रँचो हिवरखेड मध्ये अवतरला असून, त्याने शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचवा म्हणून डवरणी यंत्र निर्माण केले आहे.
ग्रामीण भागात कौशल्याची आणि टॅलेंट ची कोणतीही कमी नाही. फक्त गरज आहे ती त्यांना चालना देण्याची. शासनाची कोणतीही मदत नसताना, कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, स्वतःच्या जिद्दीतून अनेक जन आपली कल्पकता आणि कौशल्याचा वापर करून टाकाऊतून टिकाऊ अशी संकल्पना प्रत्यक्षात साकार करून दाखवतात. असाच काहीसा प्रकार हिवरखेड येथील शेतकरी पुत्र नरेंद्र तायडे यांनी करून दाखवला आहे जो अन्य शेतकऱ्यांसाठी भविष्यात निश्चितच फायदेमंद ठरणार आहे.
अलीकडच्या काळात चारा आणि पाण्याची टंचाई आणि पशुधन महागल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी बैल जोडी घेणे आवाक्यात राहत नाही. तसेच मजुरांचा अभाव ह्या गोष्टीने त्रासलेल्या हिवरखेड येथील शेतकरी पुत्र नरेंद्र तायडे यांनी आपली कल्पकता व कौशल्य वापरत स्वतःच्या हातांनी शेती उपयोगी पडणारे डवारणी यंत्र तयार केले आहे.
हे यंत्र सरी, काकरणी सोबतच,डवारणी सुद्धा करते. या यंत्राचा उपयोग सर्वच शेतकरी वर्ग घेऊ शकतो. हे यंत्र भंगारात पडलेल्या निरुपयोगी आणि स्वस्त मोटरसायकलच्या साह्याने बनविले आहे.
सदर यंत्र प्रत्यक्षात साकार करण्यासाठी नरेंद्र तायडे यांना स्वतःची मोलमजुरी, वेळ, श्रम, मानधन वगळता, 18 हजार रुपये नगदी खर्च करावा लागला. सदर यंत्र दीड लिटर म्हणजेच फक्त एकशे वीस रुपयांच्या पेट्रोलमध्ये तब्बल एका एकर शेतीची डवारणी करते असे नरेंद्र तायडे यांनी सांगितले. अशाप्रकारे अत्यंत स्वस्त दरात डवारणी करता येते. हे यंत्र बघण्यासाठी दूर दुरून शेतकरी येत असून यंत्राची मागणी करीत आहेत. हे जुगाड यंत्र बनविनाऱ्या शेतकरी पुत्राचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शासनाने अथवा स्वयंसेवी संस्थांनी आर्थिक मदतीचा हात दिल्यास आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास अनेक गरजू शेतकऱ्यांसाठी सदर प्रकारचे यंत्र निर्मितीचे कार्य करण्यास आपण तयार असल्याचे नरेंद्र तायडे यांनी अवर अकोला शी बोलताना सांगितले.
अधिक वाचा : नागरीकांची हिम्मत आणि तेल्हारा पोलिसांनी समयसूचकता दाखवत दरोडेखोरांना केले काही तासात अटक
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola