तेल्हारा (प्रतिनिधी)- काल रात्री तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाडी अदमपूर शिवारात सहा दरोडेखोरांनी एका मोटारसायकल चालकाला लुटले होते. याबाबत तेल्हारा पोलिसांना माहिती मिळताच सूत्रे हलवून नागरिकांच्या मदतीने दरोडेखोरांना काही तासातच अटक करण्यात आली. तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार येथील रहिवासी तसेच सद्या तेल्हारा येथे वास्तव्यास असलेले शिवहरी काळे (५२) हे उकळी बाजार येथून तेल्हारा येथे आपल्या मोटरसायकल क्रमांक MH-३० T ८४१४ ने येत असताना वाडी अदमपूर जवळ समोरच्या दिशेने येणाऱ्या दोन मोटारसायकल चालकांनी डोळ्यावर लाईट पाडून काळे यांना थांबवुन, त्यांना धमकावून त्याच्या पोटाला धारदार शत्रे लावून त्याच्या कडून नगद ९३० रुपये व मोबाईल ३ हजार असा मुद्देमाल लुटून पसार झाले. यानंतर शिवहरी काळे यांनी लगेच तेल्हारा पोलीस स्टेशन गाठून याबाबत माहिती दिली. यामध्ये सहा युवक दोन मोटारसायकल एक प्लॅटिना व एक ऍक्टिव्हा घेऊन मला लुटले आणि तिथून पळून गेले.
युवकांचे वर्णन व मोटारसायकल वर्णन यावरून तेल्हारा पोलिसांनी त्वरित तपास चक्र फिरवून शेगाव, उरळ पोलिसांना याबाबत माहिती देऊन शोध घेण्याचे सांगितले. तेल्हारा पोलिसांनी शोध घेणे सुरू करून याबाबत गावोगावी सूचना देऊन नाकाबंदी करून कारंजा रमजापूर येथील काही युवकांनी व नागरिकांनी या दरोडेखोरांना ओळखून त्यांना कारंजा येथे पकडले. यावेळी तेल्हारा पोलिसांनी त्वरित कारंजा गाठून दरोडेखोर युवकांना अटक करण्यात आली. यामध्ये फिर्यादी शिवहरी काळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी रामसिंग सुरेश डाबेराव(२०), सदाशिव गजानन फंदाट(२१), राहुल शाळीग्राम पवार(२२), मंगेश सुभाष सोळंके(२२), नितेश पुंजाजी डाबेराव(३३), विशाल भावराव सोळंके(२२) सर्व रा. शेगाव यांना अटक करण्यात आली, असून त्याच्याविरुद्ध कलम ३९५ भांदवी ४,२५ आर्म अक्ट नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून नगद,मोबाईल,दोन मोटारसायकल,व धारदार शस्त्रे असा ऐकून ९४ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरु,पो.हे.कॉ. नागोराव भांगे, विजय खेकडे, राजू इंगळे, गणेश सोळंके, सागर मोरे यांनी केली. पुढील तपास पो उ निरीक्षक सुधाकर गवारगुरु ,गणेश सोळंके हे करीत आहेत.
अधिक वाचा : व्यसनामुळे संसार उध्वस्त होण्या पासून रोखण्यासाठी सम्यक फाउंडेशन कार्य कौतूकास्पद-ठाणेदार विकास देवरे
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola