तेल्हारा (प्रतिनिधी)- ओढुनिया तंबाखु काढील जो धूर ! बुडेल ते घर ते ने पापे !!, या जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या विचारांची आज गरज असुन हेच विचार घेऊन तेल्हारा आगर बस स्थानक मध्ये सम्यक फाउंडेशन ग्रुप च्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती अभियान करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना तंबाखू गुटखा सिगारेट दारू पासून मुक्ती साठी सामुहिक शपथ देण्यात आली व व्यसनाचे फायदे व तोटे सांगण्यात आले. यावेळी ठाणेदार विकास देवरे यांनी तंबाखू गुटखा सिगारेट दारू या व्यसनापेक्षा ही मोबाईल च्या अतिवापर हे सुद्धा एक व्यसन असून ह्यामुळे मोठया प्रमाणात कैंसर होण्याचे निदान डॉक्टरानी केले आहे. तरी आज च्या विद्यार्थी नागरिकांनि यांनी या पासुन मुक्त राहण्यासाठी जागृत राहले पाहिजे.
यावेळी जेष्ठ व्याख्याते भीमराव परघरमोर सर यांनी संत महापुरुषांनि सुद्धा व्यसना पासून दूर राहण्याचा संदेश दिले आहेत. आजच्या युवकांनी व्यसनापासून दूर रहावे कारण ते देशाचे राष्ट्राचे भावी आधार स्तम्भ आहेत. बुद्धानि सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यसनावर आपल्या प्रवचनातून प्रहार केले आहेत. यावेळी कार्यक्रमाला तेल्हारा आगर प्रमुख वानरे, वाहतूक निरीक्षक कोळकर, बस स्थानक व्यवस्थापक राजेश खंडेराव, वाहतूक नियंत्रक दिनेश सावळे, सम्यक फाउंडेशन अध्यक्ष पंकज भारसाकळे, उपाध्यक्ष अमर भारसाकळे, सचिव प्रमोद दारोकार, कोषाध्यक्ष विनोद पवार, सदस्य आनंद बोदडे, विनोद सरदार, अफसर शाह, मूलनिवासी संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश नुपनारायण सर सेठ बन्सीधर, प्रा.म. शाळा चे मुख्याध्यापक गजानन रेवस्कर सर सह विद्यार्थी आदेश सरदार, रोशन तायडे वैभव तायडे, उपस्थित नागरिकांन मध्ये बाळू ठाकरे, विनोद दामोदर सह बस स्थानक मधील असंख्य नागरिक यांनी उपस्थित होते.
अधिक वाचा : निसर्गाचा एक असाही चमत्कार, बोअरवेल उसांडून वाहत आहे पाणी
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola