अकोट(सारंग कराळे):अकोट तालुक्यातील पणज वडाळी देशमुख रोडवरील शहापुर ब्रहुट प्रकल्प धरणात आज दि १२ ऑगस्टला वडाळी देशमुख येथील शुभम अजाबराव फुकट वय २५ वर्ष हा त्याच्या दोन मिञा सोबत धरणात पोहायला आला होता.पाण्याचा अदांज न आल्यामुळे तो बुडाल्याची माहीती आहे शुभमचे कपडे जोडा काठावर ठेवलेला दिसत आहे या परीसरात शेकडोच्या संख्येने जमाव घटनास्थळावर उपस्थित आहे.
या धरणातील रेती माफीयानी मोठ्या प्रमाणात खड्डे भुयारे तयार करुन अवैध रेतीचे उत्खनन केले आहे त्यामुळे या धरणात जिवघेणे खड्डे तयार झाले त्यामुळे पाण्याचा अदांज येत नाही तसेच या धरणावर सुरक्षा रक्षक नाही तसेच कुठल्याच प्रकारचे सुचना फलक लावलेले नाहीत हा प्रकल्प ऊभारला तेव्हा पासुन यावर्षी पहिल्यादाच एवढ्या मोठ्या प्रमाणात धरणात पाण्याची पातळी वाढलेली आहे तरी या परीसरातील गावातील पालकान मध्ये भितींचे वातावरण निर्माण झाले आहे आपल्या मुलानकडे लक्ष ठेवणे गरजेचे बनले आहे