बोर्डी (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील नावाजलेले बोर्डी गाव व आपल्या गावची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा भव्यदिव्य श्री. संत नागास्वामी महाराज यांची यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे. मंगळवार दि.13/8/2019 ला सकाळी मंदिरामधे तिर्थस्थापना पहाटे 4 वाजता होईल. सकाळी 5 ला सामुदायीक ध्यान व त्यांचे महत्व यावर प्रवचन व संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ व संध्याकाळी 7.30 ते 8 सामूदायीक प्रार्थना होईल. दि.20/8/2019 ला ह.भ.प.श्री विठ्ठलजी महाराज साबळे ( शांतीवन अमृततिर्थ ) यांचे काल्याचे कीर्तन होईल.
यात्रे निमीत्त आलेल्या सर्व भजनी मंडळाची सोमवार पासुन भोजनाची व निवासस्थानाची व्यवस्था नागास्वामी मंदिरा मधे केलेली आहे. गोपाळकाला दि.20/8/2019 ला सकाळी 11 वाजता संपन्न होवुन गावातून रथाची भव्यदिव्य अशी मिरवणूक निघेल. तरी सर्व भजनी मंडळ, हाटेलवाले, दुकानदार यांनी यात्रेची शोभा वाढवावी. तसेच अकोट ग्रामीन पोलिस स्टेशन ठानेदार फड साहेब यांनी यात्रे निमीत्त बोर्डी येथे कडक बंदोबस्त लावावा. हिच विनंती करण्यात येत आहे. यात्रे निमीत्त बोर्डी गावातील दारु विक्रेते यांनी 18,19,20 तिन दिवस पुर्णपणे आपली दारू विक्री बंद ठेवावी. म्हणजेच यात्रेला कुठलेही गालबोट लागणार नाही व यात्रा शांततेत पार पडेल. सहकार्य करावे.
विनित- श्री.संत नागास्वामी महाराज मंदिर अध्यक्ष, संचालक मंडळ व गावकरी बोर्डी तालुका, अकोट. जिल्हा- अकोला.
अधिक वाचा : लोकजागर मंच कडून कावडधारी शिवभक्तांचे स्वागत करून फराळ वाटप
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola