अकोट(सारंग कराळे)- दि. ११ऑगस्ट २०१९ रोजी अकोट शहर पोलीसानी गुप्त माहीतीवरुन तेल्हारा येथुन लोहारी मार्गाने एच ३० ए. २२२५ मध्ये प्रतिबंधित गुटखा घेवुन जातानाअन्न प्रशासन अधिकारी श्री.गोरे यांना देउन पोलीस उपनिरीक्षक अरुण मुंढे यानी लोहारी रोडवर जावुन नाकाबंदी केली असता, एक चारचाकी गाडी जिचा क्रमांक क्र.एम एच ३० ए झेड २२२५ इर्टिका कंपनिची पो.स्टॉपमदतीने थांबवुन त्यातील चालक व त्यासोबतचा इसम यास त्याचे नाव व गाव विचारले असता गाडीचा चालकाने त्याचे नाव अतुल उर्फ भगवान अंबादास वाकोडे वय २५ वर्षे व त्याचे साथिदाराने नाव संदिप बसवेश्वर मिटकरी वय ३२ वर्षे दोन्ही रा. तेल्हारा असे सांगितले.
वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर गाडीचे मागचे सिटवर प्लॉस्टिकच्या पोतडीची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा वाह कंपनीचा गूटखा २०० पाकीट किंमत अं. २७,००० रू व विमल कंपनीचा गुटखा १९५ पाकीट किंमती अं. २४००० रू असा एकुन ५१०००/- माल मिळुन आल्याने दोन्ही इसमांस व त्यांचे ताब्यातील पांढ-या रंगाची इर्टिका कंपनीची चारचाकी गाडी जिचा क्रमांक क.एम एच ३० ए झेड २२२५ किं.अं.८ लाख व त्यामध्ये मिळालेला प्रतिबधित गुटख्या माल कि.अं.५१०००/-रु.चा माल एकुण ८,५१,000/- रू चा माल ताब्यात घेउन अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांचे मार्फत अकोट शहर पोलीसानी कार्यवाही केली. वरील नमुद कार्यवाही ही मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनील सोणवने पोलीस निरीक्षक श्री.संतोष महल्ले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरूक्षक अरूण मुंढे, पो.हे. कॉ. कासम नौरंगाबादी, पो.कॉ.विरेंद्र लाड, विजय चव्हाण, सुनिल नागे, मनिष कुलट, मपोकॉ.गिता भांगे यांनी केली आहे.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola