*तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याचे थाटात उदघाट्न*
पातूर(सुनील गाडगे)- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, त्यांच्यातील चिकित्सक वृत्तीला चालना मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने विज्ञान मेळाव्याची संकल्पना साकारली आहे. या विज्ञान मेळाव्यातून अनेक बाल वैज्ञानिक घडतील असा विश्वास गटशिक्षणाधिकारी अनिल अकाळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.
राज्य विज्ञान शिक्षण संस्था व शिक्षण विभाग यांचे वतीने अखिल भारतीय विज्ञान मेळावा व राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार नुकताच पातूर तालुका विज्ञान महोत्सव किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे पार पडला. या महोत्सवाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी अनिल अकाळ होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष सुनील वावगे, किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल चे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, जेष्ठ संगीत तज्ज्ञ प्रा. विलास राऊत, जेष्ठ पत्रकार देवानंद गहिले, किड्स पॅराडाईज च्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे, समन्वयक संतोष राठोड, विज्ञान अध्यापक मंडळाचे धर्मे सर, किड्स पॅराडाईज चे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, साईबाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश बोचरे, जोशी मॅडम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल गाडगे यांनी केले. त्यानंतर सुनील वावगे यांनी मेळाव्याची भूमिका विषद केली. उद्घाटन सत्रानंतर विज्ञान मेळाव्याला सुरुवात झाली. यामध्ये तालुक्यातील एकूण पंधरा शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये प्रथम क्रमांक किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी साक्षी निमकंडे हिने पटकावला तर द्वितीय क्रमांक तुळसाबाई कावल विद्यालय बाभुळगावची विद्यर्थिनी रुपाली जाधव तर प्रोत्साहनपर शाहबाबू विद्यालयाची मेहरबानू अत्तरबेग क्रमांक मिळवला. या मेळाव्याचे परीक्षण अनिल भारसाकळे, सुनील राजनकर यांनी केले. यानंतर नाट्य महोत्सव पार पडला. यामध्ये एकूण तीन शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये प्रथम एज्युविला पब्लिक स्कूल तर द्वितीय क्रमांक सावित्रीबाई फुले विद्यालय यांनी पटकावला. या नाट्य महोत्सवाचे परीक्षण प्रा. विलास राऊत व देवानंद गहिले यांनी केले. संचालन सै. वकार यांनी केले. तर आभार रमेश पवार यांनी मानले. यावेळी विज्ञान अध्यपक मंडळाचे रमेश पवार, मनोहर कापडे, विलास काळपांडे, चंद्रकांत भोकण, अनिल भारसाकळे, सुनिल राजणकर, करोडदे सर, धर्मे सर, बोचरे सर, देवकते सर, शेळके मॕडम, अलकरी मॕडम, जोशी मॕडम, नंदनवार सर, जाकीर सर, सोहेल सर उपस्थित होते
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, शशांक कपले, प्रगती टाले, सुषमा इनामदार, भाग्यश्री तुपवाडे, नितु गिऱ्हे, सविता गिराम, कुसुम निखाडे, सुलभा परमाळे, पल्लवी शेगोकार, सुलभा तायडे, शीतल जुमळे, तुषार नारे, निकिता ढोकणे, गायत्री बराटे, बजरंग भुजबतराव, सै. वकार, शुभम पोहरे, रुपाली पोहरे, अनुराधा उगले, मेघा वडतकर आदींनी परिश्रम घेतले.