अडगांव बु(दीपक रेळे)- तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर येथे मंजर झालेल्या भारत राखीव बटालियन कॅम्पला हलविण्यात आल्याने अडगांव बु. येथे निषेध करण्यात आला.
भारत राखीव बटालियन कॅम्प बचाओ समिती अडगांव बु.च्यावतीने सोसायटी अध्यक्ष मनोहरलाल फाफट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निषेध सभेत कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते खलीलभाई, माजी पं.स.सदस्य डॉ गुलाम नबी,माजी सरपंच अशोक घाटे,मो.युसुफ भाई, गजानन मुंगसे,अ फरीदभाई, शब्युभाई, रमेश मानपुत्र, अफरोजखा,भुषण नेमाडे , मजहर अली , गुलाम आरीफ, माणिक घाटे, उमेश राहाटे, वंचित आघाडीचे माजी जि.प. सदस्य गोपाल कोल्हे ,उपसरपंच महेबूबखा पठाण , सुधाकर वानखडे, मंगलसिंग डाबेराव, देवीदास सोनोने, जहीरखा यांची प्रमुख उपस्थिती होती. रोजगार उपलब्ध नसलेल्या तालुक्याला तळेगाव वडनेर येथे मंजर भारत राखीव बटलियन कॅम्पमुळे रोजगार निर्मितीचा एक आशावाद निर्माण झाला होता. परंतु सतेतील पदाधिकाय्रांच्या नाकर्तेपणामुळे त्यांचे स्वप्न भंग झाले आहे. एवढे मात्र निक्षित. निषेध सभेचे प्रास्ताविक गोपाल कोल्हे यांनी केले. संचालन पत्रकार अशोक घाटे यांनी केले. आभार गजानन मुंगसे यांनी मानले .