केळीवेळी(अंकुश बेंडे)- अकोट तालुक्यातील केळीवेळी ते रेल हा रस्ता काही महिन्यांपूर्वी करण्यात आला मात्र रस्ता हा योग्य पद्धतीने न केल्याने तसेच शेतातील पावसाचे पाणी शेताबाहेर जाण्यासाठी काही उपाययोजना न केल्याने केळीवेळी ते रेल या सात किलोमीटर अंतरावरील शेकडो एकर जमीन ही पाण्याखाली गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
अकोट तालुक्यातील केळीवेळी ते रेल हा रस्ता काही महिन्यांपूर्वी केला मात्र तो योग्य पद्धतीने न केल्याने तसेच जिथे पावसाचे पाणी अडते अशा ठिकाणी पाईपलाईन अथवा पूल न बांधता रस्ता केल्याने या सात किलोमीटर रस्त्याच्या आजू बाजूची जमीन ही पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.ठेकेदाराने योग्य नियोजन न करता रस्ता बांधल्याने व रस्ता बांधकामात मनमानी केल्याने आमच्या शेती पाण्याखाली जाऊन पिंकाचे नुकसान झाल्याचा आरोप या परिसरातील शेतकरी संजय नागोलकार, वसंत भोंडोने ,प्रवीण गिरी,शेखर वाघ,विजय उन्होने,संजय गावंडे यांच्या सह अनेक शेतकऱ्यांनी केला आहे.