अडगाव (दिपक रेळे) – अकोट तालुका कार्यालय येथे घेण्यात आलेल्या बैठकीत राज्य सचिव राजेश डांगटे ,राज्य उपाध्यक्ष शैलेश अलोने व जिल्हा अध्यक्ष शेख अहेमद,यांच्या अध्यक्षेते खाली सर्वानुमते दीपक दारोकार यांची महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या तेल्हारा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली .संघटनेच्या धेय ,धोरणानुसार संघटना सबलीकरण करुण ,पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सर्वोत्तपरी कार्य करेल अशी ग्वाही दीपक दारोकर यांनी आपल्या भाषनात बोलताना दिली .सदर बैठकीत संघटनेचे मा जिल्हा अध्यक्ष गोपाल नारे, जेष्ठ पत्रकार विट्ठलराव गुजरकर ,जिल्हा संघटक प्रकाश आमले, निरंजन गावंडे,अकोट तालुका अध्यक्ष जगन्नाथ कोंडे ,प्रमोद सावरकर, नीलेश झाडे,गणेश वाकोड़े ,स्वप्निल सरकटे ,कुशल भगत ,अशोक झामरे, गोवर्धन चव्हाण ,नूरा भाई ,शेख तनवीर,दीपक रेळे, दिलीप अवधूत ,राजकुमार वानखड़े इत्यादि बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते ..कार्यक्रमाचे संचालन जगन्नाथ कोंडे यांनी केले असून आभार प्रदर्शन गणेश वाकोड़े यांनी करुण कार्यक्रमाची सांगता झाली…