अकोला (प्रतिनिधी): जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत आणि अशा अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचा नवे जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत राजरोसपणे सुरु असलेल्या बार्शीटाकळी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दोन वरली अड्ड्यांवर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शुक्रवारी धाडी टाकुन १७ आरोपींना अअक् केली. यामध्ये फरार झालेल्या आरोपींसह एकुण २४ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींकडून ८ मोटारसायकलींसह एकुण ३ लाख ८४ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, आपल्या आदेशाला तिलांजली देवून अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या बाशीटाकळी पोलिसांवर पोलिस अधीक्षक कोणती कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ग्राम जांभरुण येथील धाडीत अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रल्हाद देवराम तिवरे, वय ५० वर्षे, रा. कोथडी; रामजी भिकाजी लोखंडे, वय ६५ वर्षे, रा. जांभरूण; महादेव आनंदा खुळे, वय ५५ वर्षे रा. कोथडी; केशव भोजू शिंदे, वय ४५ वर्षे रा. टिटवा; शेख नसीरोद्दीन शेख रफीवोद्दीन, वय ७० वर्षे रा. बेळमाता महान; नामदेवराव बढुजी सावळे, वय ७८ वर्षे रा. पोफळी; तुकाराम ज्ञानदेव दुतोंडे, वय ३० वर्षे, वरखेड; राजू किसन जावळे वय ३५ वर्षे रा. किनखेड यांचा समावेश आहे. तसेच बार्शीटाकळी येथील वरली अड्ड्यावरील कारवाईत अटक केलेल्यांमध्ये विजय सहदेव सरदार वय ४० वर्ष रा.ग्राम पाटखेड, ता.बार्शिटाकळी, जि.अकोला ज्ञानदेव संपत अंभोरे, वय ४८ वर्ष, रा. ग्राम सावरखेड, ता. बार्शिटाकळी, जि.अकोला; शाम शालीग्राम चव्हाण, वय ३२ वर्ष रा.ग्राम जामखडकी, ता. बार्शिटाकळी, जि.अकोला; यशवंत समरत शिरसाठ, वय ५५ वर्ष, रा.खडकपुरा बार्शिटाकळी; अनिल मारोती मनवर, वय ३४ वर्ष, रा.इंदीरा आवास बार्शिटाकळी; रामदास सुखदेव दोनोडे, वय ६६ वर्ष, रा.ग्राम घोटा, ता.बार्शिटाकळी, जि. अकोला अर्जुनसिंह रंजितसिह राठोड, वय ५४ वर्ष, रा.सोमवार पेठ, बार्शिटाकळी; मुकिंदा जगदेव गवई, वय ४३ वर्ष, रा. ग्राम दगडपारवा, ता.बार्शिटाकळी, जि. अकोला; शाहबाज खा मैताब खा, वय ३५ वर्ष, रा.खडकपुरा बार्शिटाकळी यांचा समावेश असून या सर्वांना अटक झाली आहे. तर गुन्ह्यातील इतर आरोपींमध्ये नामदेव बुगाजी गिर्हे, वय ७२, रा.जांभरूण मोटारसायकल फॅशन प्रो एमएच ३० एएस ६६३८ चा मालक; मोटारसायकल हिरोहोंडा डिलक्स क्रमांक एम एच ३० टी ६०५९ चा मालक आणि मोटारसायकल हिरो होंडा एसएस एम एच ३० बी ५४१७; हिरो होंडा स्प्लेंडर एम एच ३० अजी ३१६३ चे चालक; खायवाडी करणारा बाळू पाटील उर्फ दादाराव पाटील रा महान आणि खायवाडी करणारा इरफान ख्वाजा रा. बार्शीटाकळी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कार्यवाही पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख पोलीस निरीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांनी केली आहे