अकोला (प्रतिनिधी)- राज्याचे गृह शहर विधी व न्याय विभाग, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उदयोजकता विभागाचे राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजीत पाटिल यांनी आपले एक महिन्याचे वेतन राज्यातील पुरग्रस्तांसाठि मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी साठी देवू केला आहे.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणातील विविध भागात पुरस्थिती निर्माण झाल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या स्थितीत प्रशासन मदत व बचाव कार्य करीत आहे. समाजातील विविध घटक आपापल्या परिने मदत व बचाव कार्यात योगदान देत आहेत. डॉ.रणजीत पाटिल यांनीही आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी साठी देवू केला असुन तसे पत्र समान्य प्रशासन विभागाच्या अवर सचिवांना दिले आहे.
अधिक वाचा: हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील देडतलई येथे जुगार अड्डयावर छापा
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola