तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांसाठी आज शुक्रवार दि 9 ऑगस्टला क्रांतिदिनी शिवभक्तांनच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यलय तेल्हारा येथे शासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करून भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्रावण महिन्या मध्ये तेल्हारा शहरासह तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कावड धारक शिव भक्त तेल्हारा ते अंदुरा व तेल्हारा ते धारगड ला जात असतात परंतु सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे रस्त्यात खड्ये आहेत की खड्यांमध्ये रस्ता हे समजण्याच्या पलीकडे गेले असून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे . यामुळे या रसत्यावर अनेक लहान मोठे अपघात झाले असून अनेक जन जखमी झाले तर काहींना आपला प्राण सुद्धा गमवावा लागला आहे. कावड यात्रा सुरू झाली असून सदर रस्त्यांवरील खाड्यामुळे अपघात किंवा जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही .या रस्त्यावर काही कावडधारक शिवभक्त पायी चालत असतांना जखमी सुध्दा झाले आहेत रात्रीच्या वेळेस या रस्त्यांवरून कावड धारकांना कावड घेऊन चालणे शक्य नाही . या रस्त्याकडे या विभागातील लोकप्रतिनिधी , व संबधित अधिकारी यांचे अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे . या करिता कावड धारक शिवभक्तांसह नागरिकांनी कावड यात्रा मार्गावरील खड्डे बुजवण्याबाबत आठ दिवसापूर्वी 29 जुलै ला तहसीलदार तेल्हारा यांच्या कडे खड्डे बुजविण्याबाबत भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले होते व संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी ला माहिती देण्यासाठी कळविले होते परंतु अद्याप पर्यंत खड्डे बुजविण्याचे काम सुरू न झाल्यामुळे शिवभक्तांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरविली त्या मध्ये 9 ऑगस्ट ला क्रांती दिनी तेल्हारा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून भीक मांगो आंदोलन करण्यात आले. या आंदोलना मध्ये समस्त शिवभक्त ,नागरिक, विद्यार्थी व वाहन धारकांनी मोठया संख्येने उपस्थित दर्शवली होती.