हिवरखेड (दिपक रेळे) – हिवरखेड येथील बगाडा नाल्याला पूर आल्यामुळे केळी भरून जाणारे दोन ट्रॅक्टर ट्रॉली पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना पाच ऑगस्ट सोमवारी रात्री घडली आहे. सदर दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये ड्रायव्हर आणि मजूरही होते त्यांचे बुडण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. पण सुदैवाने ते जवळपास 15 जण वेळीच पाण्यातून पोहून कसेबसे बाहेर निघाल्यामुळे त्यांचा जीव वाचला असल्याने जीवित हानी टळली आहे.
पुराच्या पाण्यात रात्रीच्या वेळी केळीचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली बरेच दूर पर्यंत वाहून गेल्या. रात्रीची वेळ आणि सर्वत्र अंधार असल्यामुळे आणि नाल्याला भलामोठा पूर असल्याने ट्रॅक्टर ट्रॉली चा शोध घेण्यास बराच विलंब लागला. परंतु पुढे एका जागी अडचण आणि झाडे असल्यामुळे त्यामध्ये ट्रॅक्टर आणि ट्रॉली अडकले. त्यामुळे त्यांचा शोध लावण्यात यश आले. परंतु त्यामध्ये असलेले केळीचे दोनशे कॅरेट, अनेक जणांचे मोबाईल महत्त्वाची कागदपत्रे त्यातील लक्षावधी रुपयांचे साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकरी, ट्रॅक्टर मालक, केळीचे व्यापारी, आणि मजूर इत्यादी अनेक जणांचे अतोनात नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच गावातील नागरिक मोठ्या संख्येत मदतीसाठी धावले आणि ट्रॅक्टरचा शोध घेण्यास मदत केली.
गुरुवारी सकाळपासूनच रामदास निंबोकार या शेतकऱ्यांच्या शेतात केळी ची कटाई सुरू होती. केळीचे ट्रॅक्टर भरेपर्यंत नदी नाल्याला कोणताही पूर नव्हता. पण बगाळा नाल्याला अचानकपणे रुद्र रूपाचा महापूर आला आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारे ट्रॅक्टर पूर्ण रेस देऊन सुद्धा पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. जर ह्या दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉली झाडामध्ये आणि अडचणीच्या जागी आडकल्या नसत्या तर थोड्या दूरवर सदर बगाळा आस नदीला मिळतो. आस नदीला त्यापेक्षाही मोठा पूर असल्याने जर आस नदीपर्यंत ट्रॅक्टर ट्रॉली वाहून गेले असते तर त्यांचा शोध लागणे सुद्धा कठीण होते. असे हादरलेल्या मजुरांनी सांगितले. सदर दोन ट्रॅक्टर ट्रॉली शराफत अली आणि फाजील खान यांच्या मालकीची असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
अधिक वाचा : कांग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी विष प्राशन करणाऱ्या त्या सहा शेतकऱ्यांची घेतली भेट
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola