अकोला : ‘जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरचा उल्लेख आला की त्यात ‘पाकव्याप्त काश्मीर’ आपोआप येतं. त्याकडं कुणीही वेगळं म्हणून पाहू नये. वेळ पडल्यास आम्ही त्यासाठी जीवही देऊ,’ असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे.
राज्यसभेनंतर शहा यांनी आज लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मांडलं. लोकसभेतील काँग्रेस गट नेते अधीर रंजन चौधरी यांनी यावेळी शहा यांच्यावर सर्व नियम पायदळी तुडवल्याचा आरोप केला. जम्मू-काश्मीरला एका रात्रीत केंद्रशासित करून टाकलं. मात्र, ते करताना ‘पाकव्याप्त काश्मीर’चा विचार केला गेला नाही, असं चौधरी म्हणाले. जम्मू-काश्मीरच्या संदर्भात भारत-पाकिस्तानमध्ये अनेक द्विपक्षीय करार झाले आहेत. मग हा प्रश्न अंतर्गत कसा, असा प्रश्नही चौधरी यांनी केला.
चौधरी यांना उत्तर देताना गृहमंत्री शहा आक्रमक झाले. ‘जम्मू-काश्मीरबद्दल कायदा करण्याचा भारतीय संसदेला पूर्ण अधिकार आहे. कोणीही संसदेला तसं करण्यापासून रोखू शकत नाही. काँग्रेसला हा प्रश्न सोडवण्यात रस होता का, हा खरा प्रश्न आहे. आम्ही जेव्हा जम्मू-काश्मीरबद्दल बोलतो, तेव्हा त्यात ‘पाकव्याप्त काश्मीर’ आणि ‘अक्साई चीन’ असतेच. त्यासाठी जीवही देऊ,’ असं शहा यांनी ठणकावून सांगितलं. अनुच्छेद ३७० मधील कलम १ ‘जैसे थे’ ठेवण्यात आलं आहे, याकडंही शहा यांनी लक्ष वेधलं.
अधिक वाचा : जम्मू-काश्मीर: जाणून घ्या कलम ‘३५ अ’ आणि कलम ‘३७०’
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola