अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा जनता दरबार उपक्रम हा सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आशेचा किरण ठरला असून, हा उपक्रम सुरु झाल्यापासून आतापर्यंत 6117 तक्रारी प्राप्त झाल्या. असून त्यापैकी 5831 तक्रारींचे निराकरण झाले आहे. यात आज (दि.5 ऑगस्ट) प्राप्त तक्रारींच्या संख्येचा समावेश नाही. एकंदर तक्रार निवारणाचे प्रमाण हे 95.32 टक्के इतके आहे.
राज्याचे गृह(शहरे), नगरविकास, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यापासून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता तक्रार निवारण दिन म्हणून दर महिन्याचा पहिला सोमवार निश्चित केला. 30 ऑक्टोबर 2017 रोजी सुरु झालेल्या या उपक्रमाला जिल्ह्यातील जनतेने प्रतिसाद दिला. हा उपक्रम दर महिन्याला न चुकता (निवडणूक आचारसंहितेचा अपवाद वगळता सुरु आहे.) आज झालेला हा जनता तक्रार निवारण दिन 38 वा होता. आजतागायत या सुविधेचा लाभ घेत शासनाच्या विविध विभागांकडे असलेल्या एकूण 6117 तक्रारी प्राप्त झाला. या तक्रारींचा यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष अनुपालन करत 5831 तक्रारींचे निराकरण झाले आहे तर अद्याप 286 तक्रारी प्रलंबित आहेत. एकंदर हे प्रमाण लक्षात घेता तक्रार निराकरणाचे प्रमाण 95.32 टक्के इतके आहे.
विभागनिहाय प्राप्त तक्रारींची संख्या पहावयाचे झाल्यास महसूल विभागाच्या 2019 तक्रारी प्राप्त झाल्या 1962 तक्रारींचे निराकरण झाले तर 57 तक्रारी प्रलंबित आहेत. जिल्हा परिषदेच्या 1472 तक्रारी होत्या त्यातील 1350 तक्रारींचे निराकरण झाले तर 122 तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. महानगरपालिकेच्या 545 तक्रारी प्राप्त झाल्या असून 525 तक्रारींचे निराकरण झाले. 20 प्रलंबित आहेत. पोलीस अधिक्षकांकडील तक्रारींपैकी 525 तक्रारींचे निराकरण झाले असुन 10 प्रलंबित आहेत. विज वितरण कंपनीशी संबंधित 250 पैकी 244 तक्रारींचे निराकरण झाले असून 6 प्रलंबित आहेत. सहकार विभागाच्या 234 पैकी 224 तक्रारींचे निराकरण झाले असून 10 प्रलंबित आहेत. जिल्हा अग्रणी बॅंकेकडील 165 पैकी 164 तक्रारींचे निराकरण झाले. तर भूमि अभिलेख कार्यालयाकडील 149 पैकी 133 तक्रारींचे निराकरण झाले आहे. कृषि विभागाशी संबंधित 183 पैकी 181 तक्रारींचे निराकरण झाले आहे. तर जातपडताळणी कार्यालयाकडील 45 पैकी 44 तक्रारींचे निराकरण झाले आहे. हे झाले प्रमुख विभागांच्या तक्रारींबाबत. अन्य विभागांशी संबंधितही आलेल्या तक्रारींपैकी बहुतांश निराकरण झाले आहे. अशा एकूण 6117 पैकी 5831 तक्रारींचे निराकरण झाले आहे.
दरम्यान, आजच्या जनता दरबारात पालकमंत्री महोदयांनी विविध विभागांच्या एकूण 198 तक्रारींबाबतची निवेदने स्विकारली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश खवले तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. आज प्राप्त विभागनिहाय तक्रारींची संख्या याप्रमाणे- महसूल विभाग 54, पोलीस विभाग 14, जिल्हा परिषद 37,. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था 5, मनपा 29, जिल्हा अग्रणी बॅंक 13, विज वितरण कंपनी 13, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख 1, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी 11, सामाजिक वनिकरण, एमआयडीसी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग, राज्य परिवहन महामंडळ. पाटबंधारे विभाग, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ यांच्या प्रत्येकी एक तक्रारी, तर जिल्हा शल्य चिकित्सक, सहा. कामगार कल्याण आयुक्त व जातपडताळणी कार्यालय यांच्या प्रत्येकी दोन तर सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या प्रत्येकी चार अशा एकूण 198 तक्रारी अर्ज प्राप्त झाले. या अर्जांचे निराकरण करण्याच्या सुचना यावेळी ना. डॉ. पाटील यांनी संबंधित विभागांना दिल्या.
अधिक वाचा : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या चौथ्या अधिवेशनाचे 7 ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथे आयोजन
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola