अकोला(श्याम बहरूपे)- देशातील सर्व ओबीसी संघटनांना एकत्र आणून तयार केलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन येत्या 7 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथील सरूर नगर, इनडोअर स्टेडियम येथे आयोजित केले आहे. देशातील ओबीसींवर होणारा अन्याय व ओबीसी समाजाचे प्रश्न व समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधून त्या पूर्ण करण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारला आवश्यक ते निर्णय ओबीसी समाजाकरिता घेण्यासाठी बाध्य करण्याकरीता, या महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महाअधिवेशनामध्ये ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करून आकडेवारी घोषित करण्यात यावी, केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, मंडल आयोग नच्चीपन समिती आणि स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी लागू करण्यात याव्या, ओबीसी शेतकरी, शेतमजुरांना साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करण्यात यावी, ओबीसींना लावण्यात आलेली नॉन क्रिमीलेअरची घटनाबाह्य अट रद्द करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना एस.सी, एस.टी प्रमाणे स्वाधार योजना सुरू करण्यात यावी, प्रत्येक तहसील व जिल्हास्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, ओबीसी समाजासाठी लोकसभा आणि विधानसभा साठी स्वतंत्र मतदार संघ स्थापन करण्यात यावे, सार्वजनिक उपक्रमांचे होत असलेले खाजगीकरण बंद करण्यात यावे, इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळास ओबीसी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देऊन महामंडळाच्या सर्व मंजूर योजना त्वरित लागू करण्यात याव्या, लोकभाषा विद्यापीठाची प्रत्येक राज्यात स्थापना करण्यात यावी या आदी मागण्यांसाठीचा ठराव या महाधिवेशनात घेण्यात येणार आहे.
तरी या अधिवेशनाला जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष माणिक शेळके, उपाध्यक्ष गजानन चिंचोळकर, बाळकृष्ण दांदळे, वैभव टिकार, अंकुश वाकोडे, महेश गोरे, अक्षय आखरे, मंगेश हुशे, तुषार डांगे,श्याम बहुरूपे, योगेश ठाकरे,अजय धांडे, विकास रोम, सुशील ठाकरे, राजेश वाकोडे, स्वप्नील अहिर आदी बांधवांनी केले आहे.
अधिक वाचा : पातुर तालुक्यातील गोळेगाव महादेव मंदिर जागृत देवस्थान,श्रावण महिन्यात भक्तांची असते मांदियाळी
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola