पातुर(सुनील गाडगे)- आलेगाव येथून जवळच असलेल्या पुरातन काळातील आलेगाव, गोळेगाव टेकडीवर असलेल्या महादेव देवस्थ्याण हे जागृत देवस्थान, म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असल्याने येथे बारमाही देवदर्शना करिता व नवस फेडण्यासाठी भक्तमंडळींची मांदियाळी असते,श्रावण महिन्यामध्ये तर जास्तच गर्दी होत असते.
पातूर तालुक्यातील आलेगाव गोळेगाव येथील निसर्गरम्य टेकडीवर पुरातन काळापासून महादेवाचे जागृत देवस्थान असल्याची ख्याती आहे,त्यामुळे शेकडो भावीकभक्त सदर देवस्थानावर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी बारमाही दिसून येतात,तसेच श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवारी भक्तांची मोठया संख्येने मांदियाळी असते. आयोजक मंडळी व आलेगाव गोळेगाव ग्रामस्थ्यानच्या वतीने श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी गेल्या पंधरा वर्षा पासून महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते व हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असतात.
सदर ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी सुरक्षा ठेऊन असतात. ग्रामस्थ्यानच्या मदतीने मंदिर ट्रस्टीनी सदर परिसरामध्ये वृक्ष लागवड,करून पर्यावरणात भर घातल्याने सदर ठिकाण पर्यटन स्थळ बनल्याने अनेक जण कुटुंबाला घेऊन दर्शन करिता व निसर्गाच्या सानिध्यात येत असतात,व भक्तमंडळी गर्दीने येत असतात येणाऱ्या ५ तारखे पासून श्रावण सोमवारला सुरुवात होणार असल्याने सदर ठिकाणी पाच सोमवार पर्यंत भक्तांची मोठी मांदियाळी राहणार आहे.
अधिक वाचा : पातूर पोलीसांची पार्डी येथील अवैध गावरान दारू अड्डयावर धाड,२१ हजाराचा मुद्देमाल जप्त
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola