पातूर (सुनील गाडगे)- पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या पार्डी शेत शिवारातील मोर्णा नदीच्या काठावर सुरु असलेल्या अवैध गावरान दारु अड्डयावर पातूर पोलीसांनी धाड टाकुन सदर दारु गुत्था उध्वस्त केल्याची माहिती पोलीस सुत्रांकडुन प्राप्त झाली आहे.
सदरची कारवाई रविवारी दुपारी ०१:३० वाजता करण्यात आली आहे. सदर कारवाई ही पातूर चे ठाणेदार गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, सोहेल शेख, रामानंद भवाणे, महिला पोलीस कांस्टेबल रेखा तोडसाम यांनी केली असुन यामध्ये आरोपी बंडु विश्वनाथ हिवराळे वय ४० वर्ष रा. पार्डी याला ताब्यात घेण्यात आले असुन या कार्यवाही मध्ये सडवा मोह २० डब्बे २०० लीटर, १० ते १५ लीटर गावरान दारु आणि दारु भट्टीचे साहित्य असा एकुण २१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अधिक वाचा : अधिग्रहित केलेल्या जमीनीचा मोबदला कमी मिळाला, म्हणून सहा शेतकऱ्यांनी घेतला विषाचा घोट
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola