तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा येथील एका १६ वर्षीय अज्ञान पिडीतेचा विनयभंग केल्याप्रकरणी पो स्टे तेल्हारा येथे आरोपी साजिद शहा वय २० वर्ष व शहाबाज शहा वय २१ वर्षे यांचे विरूध्द अपराध कः ८५ / १५ दि. २० / ०८ /२०१५ २ोनी पोस्टे तेल्हारा येथे भादवि कलम ३५४ डी, ५०६ व पोक्सो कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल होवुन सदर गुन्हा चा तपास, तपासी अंमलदार पोलीस उपनिरिक्षक श्री शरद भस्मे यांनी तपास केला व दोषारोप पत्र दाखल केले.
सदर प्रकरण हे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अकोट यांचे न्यायालयात चालले सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले व आरोपीच्या वतीने आरोपी नं २ ने बचावाचा पुरावा म्हणुन स्वतः पुरावा दिला आरोपी पैकी आरोपी शहाबाज शहा याचे विरूध्द गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी शहाबाज शहा यास वि. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोट श्री एस. ए. श्रीखंडे यांचे न्यायालयाने खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली पोक्सो कलम १२ अंतर्गत मध्ये तीन वर्षे सक्त मजुरी व रु २००० / – दंड व भादवि कलम ५०६ अंतर्गत दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली दोनही शिक्षा आरोपीस एकाच वेळी भोगायच्या आहेत वरिल प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा सरकारी वकील श्री जी. एल. इंगोले यांनी भक्कमपणे बाजु मांडली त्यांना तेल्हारा पोलीस स्टेशन येथील पैरवी अधिकारी सहा. पोलीस उपनिरिक्षक श्री विजय जांभळे यांनी सहाय्य केले.
अधिक वाचा : शिव छत्रपती साम्राज्य ग्रुप अकोट तर्फे वृक्षारोपण संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola